Shrirampur : शहरातील अतिक्रमित जागेचे सुशोभीकरण करणार – आदिक

0
कालव्याच्या कडेचे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन काळात येथील नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. आज नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी याठिकाणी बगीचा करण्यात येणार असून पाहणी करुन काम चांगल्या पद्धतीने चालू असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

शहरातील सिद्धविनायक चौक परिसरातील कालव्याच्याकडेला असलेले अतिक्रमण हटवले. याठिकाणी काही आता बगीचा करण्यात येणार असून यात बसण्यासाठी सुविधा तसेच ओपन जीम, चालण्यासाठी ट्रॅक केला जाणार आहे. सोमवारी दुपारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी समीर शेख, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, कलीम कुरेशी, उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव, नागेश सावंत, राजेश कुंदे,अ‍ॅड. जयंत चौधरी, गौरव यादव, अतिक्रमण विभागचे प्रमुख संजय शेळके, भिमा परदेशी, बाळू क्षीरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या कालव्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण आता काढले आहे. या भागातील नागरिकाचे आपण नगराध्यक्षा झाल्यापासून मागणी होती. ती पूर्ण झाली यांच बरोबर याठिकाणचे चांगल्याप्रकारे बगीचा होणार असल्याने या भागातील नागरिकाची सोय झाली आहे. याचे अपणास समाधान आहे. यावेळी नगराध्यक्षा आदिक यांनी अक्षय कॉनर याठिकाणीची ही पाहणी केली. तेथे ही लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी नगराध्यक्षा या ठिकाणचे अतिक्रमण काढून बगीचा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. याभागातील नगरिकांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी समीर शेख म्हणाले की, पालिका प्रशासन आता लॉकडाऊन काळात शहरातील शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण काढून शासकीय जागा मोकळी करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here