Maharashtra : माझा महाराष्ट्र मी आत्मनिर्भर करणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (पाहा लाईव संवाद)

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

महाराष्ट्र – रेड झोन ग्रीन झोन मध्ये आणायचे आहे. कोरोनाला हरवायचे आहे. माझा महाराष्ट्र मी आत्मनिर्भर करणारच, असा विश्वस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात चौथा लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत. खालील लिंकवर क्लिक करून पाहा मुख्यमंत्र्यांचा लाईव संवाद.

संवादातील महत्वाचे मुद्दे

  • मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा, ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कामगार परराज्यात गेले आहेत, आता भूमिपुत्रांना आवाहन आहे, जिथे जिथे ग्रीन झोनमध्ये, तिथे आत्मनिश्चयाने बाहेर पडा, महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा – मुख्यमंत्री
  • आपल्यासमोर दोन मोठी आवाहन आहे, ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही. तर दुसरं रेड झोनला ग्रीन झोन करणे – मुख्यमंत्री
  • ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे – मुख्यमंत्री
  • महाराष्ट्रात ४० हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव, जे लोक नवीन ग्रीन उद्योग सुरु करु इच्छित असतील, जे कोणतेही प्रदूषण करणार नाही, त्यांना कोणत्याही अटी नाही – मुख्यमंत्री
  • जगात पॉझचं बटण दाबलं आहे, आपल्याला भरारी घ्यायची आहे ती नक्की घेऊ – मुख्यमंत्री
  • जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे, आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू – मुख्यमंत्री
  • इतर राज्यातील मजूर रस्त्यात का चालताय, तुमच्यासाठी आधीच ट्रेनची सोय केली आहे, तुमच्या प्रत्येकासाठी बस, ट्रेनची सोय केली आहे, ते तुमची सोय करत आहेत – मुख्यमंत्री
  • मजुरांची आपण काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली, त्यांना घरी जायचं होतं, त्यासाठी प्रयत्न केले, जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले – मुख्यमंत्री

5 लाख परप्रांतीयांना घरी पाठवले
टिका झाली तरी चालेल पण मुभा नकोच
मजुरांना आवाहन, तुम्हाला सुरक्षितपणे आम्ही सोडणारच, बसेसची व ट्रेनची सुविधा, सीएम निधीतून सोय
कोकणात जाणा-यांना सीएमच आवाहन; थोडा धीर धरा
उद्योगधंदे वाढविण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे यावे

कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घ्या, सतत हात धुवा, डोळ्यांना हात लाऊ नका,
धार्मिक सणांना परवानगी नाही,
ग्रीन झोनमध्ये शिथिलता दिली
एकदा सुरू केलेली गोष्ट पुन्हा बंद पडणार नाही याची काळजी घेणार
शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही
पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपवायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here