Akole : मुलगी झाली, माहेरहून वीस लाख घेऊन ये म्हणत छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अकोले – मुलगा हवा होता मुलगी झाली तसेच घर बांधकाम व पत्नीस मेडिकल बांधून दिले त्याचे कर्ज भरण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणण्याचा तगादा लावला असता विवाहितेने नकार दिला. त्यामुळे तिला कुटुबीयांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती आशी की, काल कोतुळ येथील विवाहिता अश्विनी रोहित भुजबळ( वय 27 )यांच्या आत्महत्या केल्यप्रकरणी सुरूवातीला पोलिसांनी अकस्मात दाखल केल्यानंतर आज मयत विवाहितेचा भाऊ  सुनील लाभु गलांडे (वय 45 वर्ष) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद देऊन काैटुंबिक हिंसाचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीची बहीण अश्विनी रोहिदास भुजबळ हिचा पती रोहिदास किसन भूजबळ याच्या बरोबर दिनांक १६/०४/२०१६  रोजी विवाह झालेला आहे. यानंतर त्यांना मुलगी झाल्याने नवरा-रोहिदास किसन भुजबळ , सासरा -किसन भुजबळ, सासु -सुनंदा किसन भुजबळ, दीर -राहुल किसन भुजबळ जाव- मंगल राहुल भुजबळ (सर्व राहणार कोतूळ) यांनी विवाहितेस(मयत) आम्हाला मुलगा हवा होता, असे म्हणून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच घराचे बांधकाम वाढवायचे आहे.
विवाहितेस(पत्नीस) मेडिकल बांधून दिले आहे त्याचे कर्ज भरण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आण, असे म्हणाले असता विवाहितेने माझ्या वडिलांची परिस्थिती गरीब आहे, असे सांगितले. आरोपींनी विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी सासू सुनंदा किसन भुजबळ, हिने मयतास लग्नात दिलेले सोन्याचे दागिने काढून घेतले व नेहमी शिवीगाळ दमदाटी केल्याने विवाहितेने त्रासाला कंटाळून राहते घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत नवरा -रोहिदास किसन भुजबळ, सासरा-किसन भुजबळ, सासु-सुनंदा किसन भुजबळ, दीर -राहुल किसन भुजबळ जाव- मंगल राहुल भुजबळ (सर्व राहणार कोतूळ) याच्या विरूद्ध  गु.र..न-  १५२/२०२० भादवि कलम- ३०४3ब,३०६,४९८अ,४०६,५०४,५०६,३२३,३४प्रमाणे काैटुंबिक हिसांचार व अत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे करत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here