संगमनेर तालुक्यातील  कोरोना संशयिताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू 

अहवाल प्राप्त होईपर्यंत मृतदेह रूग्णालयात ठेवण्याचा निर्णय

संगमनेर :  कोरोना सारखी लक्षणे असल्याने  संशयीत म्हणून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तालुक्यातील एका संशयीत व्यक्तीचा आज सकाळी जिल्हा रुग्णालयातच मृत्यू झाला. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने अहवाल प्राप्त होई पर्यंत या संशयीत रुग्णाचे मृतदेह जिल्हा रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

तालुक्यातील निमोण येथील या व्यक्तीचा रविवारी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र त्याची लक्षणे करोनासारखी असल्यानेच ग्रामीण रुग्णालयाने त्याला संशयीत म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या रुग्णाचा रविवारी पाठविलेल्या  स्त्रावाचा चाचणी अहवाल अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूनंतर आज पुन्हा त्याचा स्त्राव घेतला आहे. सदर संशयिताचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट नसले तरीही खबरदारी म्हणून अहवाल मिळेपर्यंत सदर रुग्णाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी (ता.१७) तालुक्यातील निमोण परिसरातील एक व्यक्तीस श्वसनाचा त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या तपासणीत त्याची लक्षणे तीव्र असल्याचे जाणवल्याने, त्याला तातडीने रविवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्याचा स्वॅब घेवून त्याच्यावर उपचार सुरु असताना आज (ता.19) सकाळी रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला आहे. संशयीत म्हणून दाखल झालेल्या ‘त्या’ इसमाचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयाने पुन्हा एकदा त्याचा स्वॅब घेतला असून तो पुण्याच्या लष्करी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. उद्या (ता.२०) दुपार नंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने जिल्हा प्रशासनाने अहवाल प्राप्त होईपर्यंत त्याचा मृतदेह रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात काळजीचे वातावरण पसरले असून, आता त्याच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे

या घटनेने संगमनेरकरांना मात्र सतत मोठे धक्क बसत असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे . रविवारी (ता.१७) संगमनेरातील तीन संशयीत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातील चणेगाव येथील संशयिताचा स्त्राव घेण्यात चूक झाल्याने आज नव्याने त्याचा स्त्राव घेतला गेला आहे. शहरातील रहेमतनगर परिसरातील एकाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर निमोण येथील संशयिताचा आज सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून रविवारी पाठविलेल्या त्याचा स्त्रावाचा चाचणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूनंतर आज पुन्हा त्याचा स्त्राव घेतला आहे. सदर संशयिताचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट नसले तरीही खबरदारी म्हणून अहवाल मिळेपर्यंत सदर मयताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातच ठेवला जाणार आहे.
संगमनेर  तिसर्‍यांदा करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहराला सोमवारी (काल) एका संक्रमीताने धक्का दिला होता तर  आता ग्रामीणभागाला हा  दुसरा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

3 COMMENTS

  1. Thanks for some other informative blog. Where else could I am getting that kind of info written in such a perfect way? I have a project that I’m just now working on, and I have been at the look out for such info.

  2. I have been exploring for a little for any high quality articles or blog posts on this kind of house . Exploring in Yahoo I finally stumbled upon this website. Studying this info So i am satisfied to express that I’ve an incredibly good uncanny feeling I discovered just what I needed. I such a lot no doubt will make sure to don¦t omit this website and provides it a glance on a relentless basis.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here