मोठी बातमी : 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या धावणार; रेल मंत्रालयाचे ट्विट

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

1 जूनपासून देशात 200 अतिरिक्त गाड्या धावणार, अशी माहिती रेल मंत्रालयाने ट्विट करून दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रवासी रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त 1 जूनपासून 200 नवीन गाड्या धावणार आहेत.

या गाड्या बिगर वातानुकुलित फक्त द्वितीय श्रेणीच्या असणार आहेत. तिकिट बुकिंग मात्र ऑनलाईनच सुरू राहणार आहे. काऊंटर तिकिट मिळणार नाही. या दोनशे गाड्या कोणकोणत्या मार्गाने धावणार किती स्टेशनसाठी या गाड्या सुरू होणार याची माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईन, असेही रेल मंत्रालयाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here