Beed : जिल्ह्यात कोरोनाचे 19 रुग्ण

प्रतिनिधी | शितलकुमार जाधव | राष्ट्र सह्याद्री 

बीड – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 19 झाली आहे. बीड येथे पाच रुग्ण, गेवराई येथे दोन रुग्ण, माजलगाव तीन रुग्ण, आष्टी सात, एक रुग्ण मयत व सहा स्थलांतरित करण्यात आले असून केज येथे दोन रुग्ण आढळले आहे.

ईटकुर येथील पूरग्रस्त मुलीची आई वय 35 वर्षे, चंदनसावरगाव तालुका केज वय23 हा रुग्ण मुंबईवरून आला आहे. केळगाव तालुका केज वय वर्षे 29 हा पण रुग्ण मुंबईहून आला आहे. ठाणे येथून दोन रुग्ण आलेले आहेत त्यांचे वय 22 व 44 आहेत राहणार बीड येथील मोमीन पुरा भागातील आहेत ठाणे येथून आलेले तीन रुग्ण असून त्यांचे वय सोळा 14 व 36 राहणार सावतामाळी चौक बीड येथील असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
सध्याची परिस्थिती बीड जिल्ह्यात गंभीर असून बीड जिल्ह्यात कोरोणाचे रुग्ण वाढत असल्याचे कळते बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र संचारबंदी लागू असून वारंवार प्रशासन जनतेला आव्हान करत असून घरातच राहा घराच्या बाहेर निघू नका, असे असतानाही बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कोरोन फैलाव वाढत आहे तरी जनतेने सहकार्य करावे व घरातच राहावे बाहेर फिरू नये, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने बीड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे की स्वतः स्वतःची काळजी घ्या, आपण घरातच राहा घराच्या बाहेर कुठेही फिरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here