Shevgaon : राजश्री घुले यांनी मंजूर केलेल्या आरोग्यकेद्रांचे काम प्रगतीपथावर

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
ढोरजळगांव – तालुक्यातील ढोरजळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या नवीन बांधण्यात येणा-या ईमारतीने गावच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास आगामी काळात निश्चित मदत मिळणार आहे. 

ढोरजळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत मोडकळीस आली होती. ही इमारत ठिकठिकाणी खचली होती. या नवीन इमारतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्याकडे नवीन इमारतीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. मारूतरावजी घुले यांचे ढोरजळगांवकरांवर पूर्वीपासून प्रेम आहे. त्यामुळे राजश्री घुले यांनी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परीषदेच्या वतीने ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केद्रांच्या नवीन इमारत बांधकामासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. आज हे काम पूर्णत्वास असून आरोग्य सुविधायुक्त सुंदर असे प्राथमिक आरोग्य केद्रांची इमारत राजश्री घुले यांच्या प्रयत्नामुळे उभी राहिली आहे.

ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २०/२५ खेडेगांवातील रूग्ण आरोग्यसेवेचा लाभ घेत असून या ठिकाणी दोन वैद्यकिय आधिका-यांसह मोठा स्टॉप असून दैनंदिन २०० रूग्णांची तपासणी या ठिकाणी केली जाते. आता नवीन इमारत बांधणीमुळे तालुकास्तरावरील वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात पुढील काळात मिळणार असून सर्वांसाठी ते निश्चित अभिमानाची बाब आहे.

जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनात आरोग्यसमस्यांमध्ये सध्या भरीव वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज खाजगी दवाखान्यात उपचारासाठी लाखो रूपये खर्च येत असताना सर्वसामान्य नागरिकांना आता प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रूग्णालय याठिकाणी चांगली वैद्यकीय सेवा देली जात आहे. ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन इमारत दिल्याबद्दल जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या कामाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here