Shevgaon : तहसिल व पंचायतसमिती आयोजित कोरोना जनजागृती स्पर्धांचे निकाल जाहीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – तहसिल कार्यालय शेवगाव व पंचायातसमिती शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, कोरोना जनजागृती (कोव्हीड-१९) अंतर्गत विविध गटात सहा प्रकारच्या स्पर्धा घरबसल्या घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा तालुकास्तरीय होत्या. या स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे विद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद अविनाश काटे याने ६ वी ते ८ वी गटात हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर चैतन्य किशोर आमटे याने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व  श्रावणी गणेश पवार हिने ६ वी ते ८ वी गटात रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशस्वी विद्यार्थांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड विद्याधरजी काकडे, जि.प.सदस्या हर्षदा  काकडे, मध्यवर्ती समिती अध्यक्ष शिवनाथ देवढे, प्राचार्य चंद्रकांत आहेर, उपप्राचार्य सुनील आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका मंदाकिनी भालसिंग, पुष्पलता गरुड, कोटा एक्सलन्सचे प्रमुख हरीष खरड, राजेश दारकुंडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालक आदिंनी अभिनंदन केले. सर्व सहभागी विद्यार्थांमध्ये या स्पर्धेमुळे कोरोनाबाबत जनजागृती होऊन यांच्या मुक्त अभिव्यक्तीस चालना मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here