Home Maharashtra Beed Kada : दीड महिन्यांपासून खाकीतला “बाजीप्रभू” लढतोय सीमेवरची खिंड

Kada : दीड महिन्यांपासून खाकीतला “बाजीप्रभू” लढतोय सीमेवरची खिंड

1

कोरोनाच्या अज्ञात शत्रूला खिंडीत रोखणारा योद्धा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र जैन

घोडखिंडीतील लढाईत मराठा साम्राज्याचा शूर योध्दा बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूला खिंडीत रोखून अतुलनीय पराक्रम गाजवला होता. त्या पराक्रमाची खाकीतल्या एका बाजीप्रभू अन् त्यांच्या मावळ्यांनी जनतेच्या रक्षणार्थ कोरोनाच्या शत्रूशी दीड महिन्यांपेक्षा अधिक एकाकी झूंज देत सीमेवर रोखून एपीआय ज्ञानेश्वर कुकलारेंनी इतिहासातील पराक्रमी बाजीप्रभूंच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

आष्टी तालुक्यातील बीड- नगर मार्गावरील दोनही जिल्ह्याच्या सीमेवर अंभोरा पोलिस ठाणे आहे. त्यामुळे दळण-वळणाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मार्गच ठरतो. या ठाण्यांतर्गत त्र्यांऐशी गावांसहीत पन्नास कि.मी. अंतराचा परिसर आहे. बीड जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर असलेल्या ठाण्याला चारही बाजूने नगरने वेढलेले आहे. त्यामुळे याठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून, त्र्यांऐशी गावांचं रक्षण करणे, म्हणजे पोलिसांसाठी एकप्रकारे आव्हानच आहे. परंतू म्हणतात ना एखाद्या जहाजाचा कॅप्टन जर साहसी असेल तर समुद्राच्या लाटाही तेथे नतमस्तक होतात. हेच खाकीतल्या एका कर्तव्यदक्ष अधिका-याने आपल्या कृतितून दाखविले.

एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे यांनी एक वर्षापुर्वी अंभोरा पोलिस ठाण्याचा पदभार घेतला. अन् अवघ्या काही दिवसातच कायद्याची जरब कशाला म्हणतात, याची झलक भल्याभल्यांना दाखवत,  अंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत शिस्तप्रिय कार्यपध्दती, संयम अन् कर्तृत्वाचा ठसा उमटवून जिल्हयात पोलिस प्रशासनाची मान उंचावली. जनतेच्या रक्षणार्थ हा खाकीतला बाजीप्रभू मागील दीड महिन्यापासून आपल्या सहकारी मावळ्यांसह सीमेवरच्या चेकपोष्टवर डोळ्यात तेल घालून कोरोनाच्या अज्ञात शत्रूशी एकाकी लढा देताना दिसत आहे.एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, पीएसआय राहूल लोखंडे, सचिन दाभाडेंसह त्यांच्या तीस सहकार्यांनी कोरोनाची भयावह परिस्थिती हाताळताना केलेलं उत्कृष्ठ नियोजन व कौशल्य हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आतापर्यंत मिळालेल्या यशामध्ये आरोग्य कर्मचा-यांप्रमाणेच अंभो-याच्या या  खाकी वर्दीतल्या बाजीप्रभूंचे योगदान देखील महत्वाचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पोलिसांचं उत्कृष्ठ नियोजन व कौशल्य
कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी खाकीतल्या एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे अन् त्यांच्या सहकार्यांनी मागील सलग पंचावन्र दिवस केलेले उत्कृष्ठ नियोजन व दाखवलेले कौशल्य हेच महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यास ब-याच प्रमाणात उपयोगी पडले आहे. त्यामुळे अंभोरा पोलिसांची कामगिरी ख-या अर्थाने आष्टीकरांच्या कौतुकासपात्र ठरली आहे.

1 COMMENT

  1. I was very pleased to search out this internet-site.I wanted to thanks on your time for this excellent learn!! I definitely enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here