Beed : साळींबारोड वरील कोर्टासमोरील इमारत परीसर संपूर्ण संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी रेखावार

वडवणी शहरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने निर्णय
बीड – वडवणी शहरातील साळींबारोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे १ कोरोना विषाणू संसर्ग लागण झालेला ६७ वर्षे वयाचा रुग्ण आढळून आला आहे. याचा इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार वडवणी शहरातील साळींबारोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे हा रुग्ण व इतर संशयित व्यक्ती राहात होते. कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर बफर झोन (Buffer zone )म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

5 COMMENTS

  1. What i don’t understood is in fact how you’re no longer really a lot more neatly-liked than you might be right now. You are so intelligent. You recognize therefore significantly in the case of this matter, made me in my view consider it from a lot of various angles. Its like men and women aren’t involved unless it’s something to accomplish with Girl gaga! Your individual stuffs great. Always take care of it up!

  2. I don’t even know how I stopped up here, but I believed this put up was great. I do not recognise who you are but certainly you are going to a well-known blogger if you aren’t already 😉 Cheers!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here