Maharashtra : शेतक-यांना बांधावरच बियाणे मिळण्यासाठी नियोजन; 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविण्याचा प्रयत्न

0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची बैठक; बांधावर बी बियाणे देणे, खरीप हंगाम, शेतमाल विक्री यावर चर्चा

शेतक-यांना बांधावरच बियाणे मिळण्यासाठी नियोजन असून 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. गर्दी टाळण्यासाठी तीन हजार शेतकरी गटाच्या मदतीने नियोजन सुरू असून गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची बैठक पार पडली. बैठकीत बांधावर बी बियाणे देणे, खरीप हंगाम, शेतमाल विक्री यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंगला उपस्थित होते.

तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, विश्वजित कदम उपस्थित होते.

राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र 140.11 लाख हेक्टर आहे. यात सोयाबीन व कापूस 82 लाख हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांना बियाणांची गरज 16.15 लाख क्विंटल आहे. तर बियाणांची उपलब्धता 17.01 लाख क्विंटल इतकी आहे. सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे 60 टक्के क्षेत्र आहे, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here