ShirurKasar : कापूस तुरीचा पिकविमा मिळणार तरी कधी?

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

धनुभाऊ संकटात तरी शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करा; शेतक-यांची मागणी
शिरूरकासार – तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2019चा खरिपाच्या कापूस तूर या पिकांचा मंजूर झालेला पिकविमा वर्षे झाले तरी अद्यापही मिळाला नसल्याने शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून समाजकल्याण मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून कोरोनाच्या संकटात लवकर पिकविमा मिळवून देऊन आधार द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात गेली पाच ते सहा वर्षांपासून निसर्गाच्या संकटाने शेतकरी राजा पूर्णतः घायाळ झाला आहे. सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस होईल या आशेवर खरीपाची कापूस, तुर, बाजरी, ऊडीद, सोयाबीन ,भुईमूग ही पिके घेतली. परंतु सुरवातीला पाऊस कमी पडला पुढील पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड केली. पुढे चालून रिमझिम पावसावर पिके वर आली परंतु नंतर पावसाने दांडी मारल्याने खरिपाची, कापूस, तूर, बाजरी स्वयाबिन, उडीद भुईमूग ही पिके पारच कोमात गेली.
पावसाळा रूतू संपत आल्यानंतर शेवटी अतिवृष्टी झाली. त्यामुळे आलेली काही पिके पाण्यातच गेली. थोडी फार आली त्यात खर्चही निघाला नाही प्रशासनाच्या अहवालानसुसार खरिपाचा पिकविमा मंजूर झाला परंतु तो अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असल्यामुळे त्याला मदतीची गरज असताना पावसाळा जवळ आला तरी पिकविमा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकविमा कंपन्या वेळ काढुपणा करून दिवस पुढे ढकलत आहेत.

याची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निदान पिकविमा मिळवून देऊन  आधार द्यावा, अशी बीड जिल्ह्यातून मागणी होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here