Newasa : घोडेगाव येथे कापड दुकानाला भीषण आग; सुमारे 10 लाखाचे नुकसान

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
          
नेवासा – तालुक्यातील घोडेगाव येथील भक्ती कापड दुकानाला गुरुवारी मध्यरात्री नंतर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास दुकान उघडले असता शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
टॉवेल, रुमाल, अंतर्वस्त्र आदी कापडी गठ्ठे आगीच्या भक्षस्थानी पडले. पंखे, लोखंडी कपाट जळून ते काळेठिक्कर पडले. पंख्याची पाती वाकली. आतील भिंती काळ्या पडल्या. आगीमुळे प्रचंड तापमानात त्या खिळखिळ्या झाल्या.
सुमारे 10 लाखांचा माल जळून खाक झाला आहे.
नगर-औरंगाबाद राज्य मार्गावरील घोडेगाव येथील हे कापड दुकान आहे. आग विझविण्यासाठी शेजारील नारायण चौधरी यांनी तातडीने बोअरवेलची पाण्याची मोटार चालू करून सहकार्य केले. त्याच बरोबर स्थानिक नागरिकांनी देखील आग विझविण्याच्या कामात मदत केली. आगीमुळे दुकानांमधील सर्व कापडी माल जळून खाक झाला असून या आगीमध्ये 10 लाख रुपयांची रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कापड दुकान मालक तुकाराम भरत जरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here