Beed : Corona Breaking : मोठा धक्का! उर्वरित 13 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बीड – जिल्ह्यात कोरोना या विषाणूने कहरच केला असून काल राहिलेल्या 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्याला जबरदस्त धक्का बसला आहे. जिल्ह्यातील जनतेने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहर व ग्रामीण भागामध्ये शासनाच्या आदेशाचे पालन केले होते.

मुंबई पुण्यासह ईतर शहरातून आलेल्या लोकांनी जिल्ह्यातील जनतेचा घोर वाढवला काल (दि20) राहिलेले 13 अहवाल
दुपारनंतर जाहीर झाले. अन् सर्वच म्हणजे 13 पॉझिटिव आल्याने जिल्ह्याला हा जबरदस्त धक्का आहे. आता संख्या 36 वर जाऊन पोहोचली त्यापैकी 1 महिला दगावली, 1पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला आणि 6 पुण्याला पाठवण्यात आले ते 8 जण कमी झाले त्यामुळे आता 28 कोरोना पॉझिटिव्ह जिल्ह्यात संख्या आहे. कालचे 13 पॉझिटीव आल्यामुळे जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या पुढील प्रमाणे

गेवराई-२
माजलगाव-१५
बीड -५
केज-२
वडवणी -१
पाटोदा – ३
धारुर -१
नवीन अहवाल प्राप्त झालेले रुग्ण पुढिलप्रमाणे आहेत.
1  – सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 – कुंडी ता.धारूर
11 – नित्रूड ता.माजलगाव
जिल्हयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण २९ झाली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here