Sangamner : क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे यांच्या मामाचा विहिरीत पडून मृत्यू

आश्वी खुर्द येथील घटना
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पिंपरणे – भारतीय संघातील क्रिकेट खेळाडू अजिंक्य राहाणे यांचे मामा व संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल प्रगतशील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड यांचे मंगळवारी सायंकाळी विहिरीत पाय घसरुण पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी ४. ३० वाजेच्या सुमारास राजेद्र गायकवाड हे शेतातील विहिरीवरील विद्यूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबातील व्यक्तींनी शोधा-शोध सुरु केली. यावेळी शेतातील विहिरीलगत त्याना संशय आल्याने शोध घेतला असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यानतंर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले आहे.
दरम्यान, राजेंद्र गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे यांचे मामा असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजय, तीन बहीनी, मेव्हणे व वडील असा मोठा परिवार आहे. येथिल प्रसिद्ध डॉक्टर गणेश गायकवाड यांचे ते बंधु होते. त्याच्या अकस्मात निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here