National : 1 जूनपासून सोडण्यात येणा-या 200 गाड्यांसाठी तिकिट बुकिंग आजपासून सुरू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

1 जूनपासून सोडण्यात येणा-या 200 गाड्यांसाठी तिकिट बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आपल्याला या 200 गाड्यांची यादी वाचायला मिळेन. 

या गाड्यांसाठी केवळ ऑनलाईन तिकिट बुक करता येणार आहे. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार RAC आणि वेटिंग तिकिटही देण्यात येणार आहे. मात्र, वेटिंग वाल्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात येणार नाही. सुरुवातीला रेल्वेने फक्त नॉन एसीच्या गाड्या सोडण्यात येणार होत्या. मात्र, नंतर यात बदल करत एसी डब्बे देखील सोडण्यात येणार आहेत.

आज सकाळी 10 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून बुकिंग सुरू झाले आहे. यात्रेकरूंना 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचणे गरजेचे आहे. सर्व यात्रेकरूंची थर्मल तपासणी करण्यात येईन. ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळून येतील त्यांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here