Newasa : हंडीनिमगाव शिवारात ५५ हजाराची देशी विदेशी दारू जप्त; एकास अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नेवासा – फाट्यानजीक असलेल्या हंडीनिमगाव शिवारात ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेला ५५ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आलेली आहे. 

नेवासे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हंडीनिमगाव शिवारात असलेल्या ईलाक्षी शोरूमच्या मागे योसेफ कांबळे यांच्या उसाच्या शेतात टाकलेल्या छाप्यात प्रकाश उर्फ बंटी बन्यामीन साळवे (वय २८) मूळ रा. मक्तापूर हल्ली मुक्काम हंडीनिमगाव शिवार याने ठेवलेले मॅकडॉल कंपनीची देशी व विदेशी दारू सहा बॉक्स किंमत ४३ हजार २०० रुपये, पाच बॉक्स भिंगरी १२ हजार ४८० रुपये किमतीची असे एकूण ५५ हजार ६८० रुपये किमतीचा दारू जप्त करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जीवितास धोकादायक असलेल्या करोना रोगाचे संसर्ग पसरविण्याचे संभव असलेली घातक कृती केल्या प्रकरणी मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम ६५ (ई) व भादवि कलम १८८, २६९, २७० प्रमाणे नेवासे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी प्रकाश उर्फ बंटी साळवे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल वसीम मुस्तफा इनामदार यांनी दिली आहे.

हा छापा पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाळकृष्ण ठोंबरे, महेश कचे, वसीम इनामदार, संभाजी गर्जे, संदीप म्हस्के, गणेश गलधर, बाळू खेडकर, चंद्रावती शिंदे, कल्पना गावडे यांनी टाकला.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी मंगळापूर ते गळनिंब जाणाऱ्या रस्त्यावर २७ हजार २०० रुपये किमतीची दुचाकीसह दारू दुचाकीवरून वाहतूक करताना प्रकाश उर्फ बंटी साळवे हा मिळून आला होता. परंतु सदर घटनेत बंटी साळवे या पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here