Shevgaon : जिल्हा परिषद शाळा बनली दारुचा अड्डा! वडुले प्राथमिक शाळेतील प्रकार

ग्रामस्थांमध्ये रोषाचे वातावरण; कडक कारवाईची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | दीपक खोसे

ढोरजळगांव – देशाची भावी पिढी घडविणा-या विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडुले खुर्द इथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनलाय दारूचा अड्डा ग्रामस्थांमधून हा चिंतेचा विषय बनला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. मध्यंतरी वाईन शॉप बंद असतानाही वडुले येथील विद्येच्या माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या प्रांगणात दारूच्या बाटल्याचा खच दिसून आला ही निश्चित खेदाची बाब आहे.

तरूणांमधून या गोष्टीबद्दल मोठा रोष दिसून येत असून शाळेच्या प्रांगणात काही बकासूर दारूचा सडा टाकत आहेत. हे पाहुन खूप वाईट वाटलं… आम्ही या विद्येच्या माहेर घरामध्ये काही कामानिमित्त चर्चा करण्यासाठी आलो असता समोर हे वाईट…विचित्र…मनाला खिन्न.. करणार चित्र पाहून मन सुन्न झालं. हे आमचं विद्येच मंदिर असल्यामुळे मन राहवलं नाही म्हणून भर दुपारी बारा वाजता शाळेच्या प्रांगणातील दारूच्या बाटल्या, बिसलेरीच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, दारू पिण्याचे ग्लास, फरसाणची – शेवाची पाकीटे आम्ही गोळा केली कारण ही आमची शाळा आहे. पण शेवटी जेव्हा दारुच्या बाटल्यांची ग्लासांची गोळाबेरीज केली असता तो आकडा मनाला थक्क करणारा होता.

आम्ही या दारूच्या बाटल्या व इतर सर्व वस्तू गोळा केल्या. परंतु हा लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा आमची चिमुकली  मुले शाळेत पाऊल ठेवतील तेव्हा त्यांनी यातून काय बोध आदर्श घ्यावा आणि काचांचा सडा पडलेल्या या प्रांगणामध्ये चिमुकल्यांनी कसं खेळावं कसं बागडावं ??? ही मनाला सून्न करणारी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया तरुणांनी दिली.

चिमुकल्यांच्या व शाळेच्या भविष्याचा विचार करुन ग्रामस्थ व प्रशासनाने, असे कृत्य विद्यादालनात करणा-यावर चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here