Newasa : शिंगणापूरमध्ये शनीजयंती साजरी

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – दरवर्षीप्रमाणे शनीजयंतीचे औचित्य साधून शनीदेवाची विधीवत पूजा अभिषेक करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून शनीजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यामध्ये सात दिवस भागवत कथा रामायण देवी भागवत अशा विविध प्रकारच्या धार्मिक कथा आयोजित करण्यात येतात शिंगणापूर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबुराव बानकर यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शनिरत्न या नावाने पुरस्कार दिला जातो. तर सात दिवस चालणा-या कार्यक्रमात रोज नामांकित महाराजांचे किर्तन हरीपाठ काकडा आरती भजन अशा धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते.

या काळात स्थानिका बरोबरच परप्रांतीय लाखो भाविक हजेरी लावतात शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप मोठ्या प्रमाणावर होत असते. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता व पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अजिबात गर्दी न करता साध्या पध्दतीने व सामाजिक अंतर राखून निवडक
भक्तांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता त्रिंबक महाराज यांच्या हस्ते शनी देवाची विधीवत पूजा आरती
करण्यात आली. यावर्षी सर्वच कार्यक्रम टाळण्यात आले. तर शिंगणापूरचे स्थानिक भाविक व सरपंचाना देखील मंदिरात येण्यास मज्जाव करण्यातआला प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी देखील आत जाऊ शकत नाही. त्यावर स्थानिकांनी रोष व्यक्त केला.

शिंगणापूरमध्ये अजूनही महिलांना आरतीवेळी मंदिरात नो एन्ट्री !
महिला विश्वस्त शालीनी लांडे यांना पोलिसांनी आरतीसाठी मंदिरात न सोडल्याने पोलिसांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. शिंगणापूरचे पोलिस अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला व आरतीला नियमापेक्षा जास्त असणाऱ्या भाविकांवर कारवाई करावी, अशी तोंडी तक्रार शेवगावचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्याकडे केली. यावर सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग पाहून कारवाई करण्याचे आश्वासन जवळे यांनी दिले. दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शेकडो स्थानिक भाविकांनी मंदिराच्या बाहेर सामाजिक अंतर व तोंडावर मास्क बांधून शनी देवाचे दर्शन घेतले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here