Shrigonda : पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षाने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील रमेश खोमणे या शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडून गेल्याने शेतकऱ्याने वावरतील कांद्यावर नांगर फिरविल्याने. शेतकऱ्याचे सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

एकीकडे कोरोना विषाणुमूळे शेतीमालाला उठाव नाही. विकायचा म्हटले तर लॉकडाऊनच्या काळात तो विकताही येत नव्हता आणि विकायला जावे तर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला शेतीत केलेल्या खर्चा इतके देखील पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

असाच एक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळ्यातील रमेश भानुदास खोमणे यांच्या बाबतीत झाला असून त्यांनी शेतात ४ एकर कांदा पेरला होता. कांदा काढणीला आलेला असताना कांद्याला चांगला बाजार भाव देखील होता. नेमके त्याच वेळेस विसापूर कॅनोलला पाणी सुटल्याने कॅनॉलचे पाणी कांद्याच्या शेतात येऊन साचले होते. शेतात कॅनॉलचे पाणी येत असल्याचे खोमणे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे खोमणे यांचा कांदा शेतातच सडून गेल्याने त्यांनी ४ एकर कांद्यावर नांगर फिरवत त्याचे खत केले. या गोष्टीमुळे रमेश खोमणे यांचे सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. शिवाय कांद्यासाठी केलेला खर्च देखील वायाला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here