Karjat : अखेर दोन महिन्यानंतर सुनसान कर्जत बस स्थानकात ती अवतरली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २२

कर्जत : तब्बल दोन महिन्यांनी एस.टी.बस कर्जत बसस्थानकात अवतरली असून बसमध्ये मात्र प्रवाशांची वाणवा जाणवली असल्याचे पहिल्या बसच्या चालक आणि वाहकाने सांगितले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २० मार्चपासून कर्जत येथील बसस्थानकात एस.टी.बससेवा बंद झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून कर्जतला एस.टी.बसचे दर्शनही झाले नाही. आज दि.२२ मे रोजी तब्बल दोन महिन्यानंतर पहिली बस स्थानकात सकाळी ९|३० वा. तारकपूर आगाराची अहमदनगर-राशिन या बसचे आगमन झाले. यावेळी मात्र बसकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे दिसले.
अहमदनगर ते कर्जत प्रवासा दरम्यान एकही प्रवाशी न मिळाल्याचे चालक आणि वाहकाने सांगितले. आजपासून एस.टी.बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच एस.टी.महामंडळाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करुन प्रवाशांनी प्रवास करावा, असे चालक एम.एच.शौकती आणि वाहक जी.व्ही.छिंदम यांनी सांगितले. यावेळी श्रीगोंदा-कर्जत आणि कर्जत जामखेड अशा प्रत्येकी एक एक बस आल्या श्रीगोंदा ते कर्जत, असे सरकारी कर्मचारी असलेले चार प्रवासी आले असल्याचे समजते आहे.
एका बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवत २२ प्रवासी मास्क बंधनकारक करीत प्रवेश करतील. यात १० वर्षाच्या आतील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाही. मात्र, अत्यावश्यक असल्यास योग्य कागदपत्रे तपासणी करुन प्रवेश दिला जाईल. खबरदारी म्हणून बस निर्जंतुकीकरण केलेले आहेत. सध्या अहमदनगर, श्रीगोंदा, जामखेड या आगाराच्या गाड्या उपलब्ध असतील.
– एन.के.दरेकर, वाहतूक नियंत्रक, कर्जत

81 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here