Shrigonda : जुगार छाप्यातील रकमेविषयी चौकशी करण्याची मागणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शहरातील हॉटेल सिद्धी येथे जुगार खेळत असल्याने नऊ जणांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांनी कारवाई केली होती. या कारवाईत दाखवण्यात आलेल्या रोख रक्कम मुद्देमाल बाबत तीन जणांनी तक्रार अर्ज दिले असून एक तर गुन्ह्यात केवळ दहा हजार रुपये दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात लाखाच्यावर मुद्देमाल असताना उर्वरित रकम कुठे गायब झाली. याची चौकशी करण्याची मागणी या अर्जात करण्यात आली आहे. मच्छिंद्र सुद्रीक, संतोष बोळगे, शरद गांजुरे यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला आहे. 
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने शहरातील हॉटेल सिद्धी येथे जुगार खेळत असल्याने नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी खिशात असलेली रक्कम ही काढून घेण्यात आली. मोबाईल व गाड्या सोडण्यासाठी काही रक्कम मागण्यात आली. यावेळी कारवाईत सहभागी असलेल्या एक पोलिसाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
प्रत्यक्षात फिर्यादीमध्ये जी रक्कम दाखवण्यात आली.
ती खिशात असलेल्या रक्कम यापेक्षा कमी दाखवून उर्वरित रक्कम गायब करण्यात आली. ही उर्वरीत रक्कम फिर्यादीत न दाखवता गायब करण्यात आली असल्याने या कारवाईची चौकशी करावी. या कारवाईत जे पोलीस कर्मचारी सहभागी होते. त्यांची सखोल चौकशी करावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार मच्छिंद्र सुद्रीक, संतोष बोळगे, शरद गांजुरे यांनी अर्ज पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here