भास्करायणः१- कोरोना’राज’…

Rashra Sahyadri Special:

आज भा.ज.प ने सरकारविरुध्द आंदोलन केले. अर्थात आंदोलन करणे हा लोकशाहितील अधिकार आहे. सरकार चुकत असेल तर सरकारला जाणिव करुन देणे आवश्यक असते. ती जबाबादारी भा.ज.प.ने पार पाडली.
तथापि त्यापूर्वी राज्यात कोरोना कां वाढला, याची कारणमिमांसाही महत्वाची आहे.


१)केन्द्र शासनाने म्हणजे पंतप्रधानांनी स्वभावानुसार सनसनाटी लाॕकडाऊन जारी केला. इथे मोठी चूक झाली. मुंबई, पुणेसह विविध राज्यात कोट्यावधी मजूर अडकलेत त्याचा विचारच झाला नाही. यामुळे सोशल डिस्टिंगचा बोजवारा वाजला.

२)वास्तविक पाच दिवस ज्याला त्याला गावी जायची मुभा देवून लाॕकडाऊन घेणे गरजेचे होते. तसे झाले असते तर स्थलांतरीतांचा प्रश्न निर्माण झाला नसता. आज जे सर्वप्रथम करायला हवे ते सरतेशेवटी केले जात आहे.

३) देशात पहिला रुग्ण जानेवारित केरळमध्ये आढळला. तेव्हाच केन्द्र शासनाने उपाययोजनेसाठी दक्ष व्हायला हवे होते. पी.पी.ई किटस्!हाॕस्पिटल, आरोग्य कर्मचारी, आवश्यक व्हेंटिलेटर्स व औषधे याची तेव्हाच दक्षता घ्यायला हवी होती. तसे न होता आजार फैलावल्यावर तयारी सुरु झाली. हा ‘बैल गेला खोपा केला’ प्रकार घडला.

४) तसे घडले असते तर आज जी स्थिती उदभवलीच नसती. स्थलांतरित मजुरांमुळे मुंबई पुणे, अहमदाबाद, सूरत, अशा महानगरांवर ताण वाढला नसता.

५) महाराष्ट्राने मरकजला पालघर येथे कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारली. मार्च महिन्यात मात्र केन्द्र अखत्यारितील दिल्लीला या कार्यक्रमास परवानगी दिली. त्यांना वेळीच पांगविण्यात अपयश आले. या तगलिबीगींमुळे महाराष्ट्रात कोरोना व्याप्ती वाढली. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर वगळता ग्रामिण भागात अद्याप कोरोना अटोक्यात आहे, हे ध्यानात घेतले जावे.

६) संकटकाळी सर्व राज्यांना दक्ष करण्यासाठी संवाद साधून अवगत करावे लागते. केन्द्रशासनाने सनसनाटी पध्दतीने एकाएकी चार तासाचा अवधी देत लहर आल्याप्रमाणे लाॕकडाऊन जारी केला. राज्याशी संवाद केला तो त्यानंतर दुस-या लाॕकडाऊन वेळी. एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारे गोंधळून गेली. मुंबईत,परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक होवून अराजकाची स्थिती उद्भवली ती या समन्वयाच्या अभावामुळे. तसेच राज्यशासन व जनतेला पहिला लाॕकडाऊन जाहिर करतानाच मे अखेरीचा कृती आराखडा दिला असता तर सूक्ष्म नियोजन करणे शक्य झाले असते.

७) यामुळे कोरोनावर एकाग्रतेने काम करणे अवघड बनले. सरकारला एकाचवेळी रुग्ण, स्थलांतरित प्रश्न, अतिरिक्त सुविधा उलब्ध करणे यावरच विकेन्द्रीत झाले.

८) काय करायचे याची परिपत्रके निघतात. एका दिवशी पत्रक काढायचे आणि दुस-या दिवशी बदलायचे. यामुळे सावळांगोंधळ उडाला. प्रशासनाला काय करावे हे नेमके कळेनासे झाले.

९) जनतेनेही बेपर्वाई दाखविली. लाॕकडाऊन असताना अनेकजण अनावश्यक फिरत होते. पोलिसांना मारहाण, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी आक्षेपार्ह वागत होते. या सगळ्यात यंत्रणेवरचा ताण अनावश्य वाढला. फोटो व प्रसिध्दीबहाद्दरांनी असहाय लोकांची असहायतेचा फायदा प्रसिद्धिसाठी करुन घेतला. जनतेच्या असहकारामुळे पोलिसांना त्यांच्या क्षमतेइतके काम करता येईनासे झाले.

१०) या सगळ्या गोंधळात राज्य सरकारही गोंधळले. प्रशासकिय समन्वयात त्रुटी राहिल्या.
अधिकाऱ्यांना अनिर्बंध अधिकार दिल्याने अधिकारीच निर्णय घेवू लागले. यात विरोधकांनीही राजभवनाचा आश्रय घेवून सरकारविरुध्द असहकाराची भूमिका घेतली. असे हे करोनायण…(क्रमशः)
भास्कर खंडागळे ,बेलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here