Beed : घरात तलवारीसह अन्य शस्त्रांचा साठा; दोघांना अटक

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरातील पालवान चौक येथे एका व्यक्तीच्या घरात तलवारीसह अन्य शस्त्रांचा साठा बीड पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तलवारी जप्त केल्या असून कारवाईत दोघांना अटक केली आहे. 

करण मंगल सिंग टाक व राजू मंगलसिंग टाक, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बीड आरोपी टाक यांच्या घरात शस्त्र असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घरावर छापा टाकून झडती घेतली असता तलवारी, रामपुरी चाकू, छऱ्याचे गण घरामध्ये साठा करून ठेवलेले आढळले.  पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला असून दोन्ही आरोपींना अटक केली. अधिक तपास पेठ बीड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here