Shrigonda : पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या विरोधात अरेरावी व अश्लील भाषा वापरल्याने, बाबासाहेब भोस यांच्यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी जुगार अडड्यावर कारवाई केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याविरुद्ध अश्लील भाषा वापरून पोलीस नाईक पितळे यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भोस यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 507 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस नाईक संदीप रंगनाथ पितळे, यांची श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुमारे ४ वर्षापासून नेमणूक आहे. ते सध्या श्रीगोंदा शहर बीट अंमलदार म्हणून, कर्तव्य पार पाडत आहेत. दिनांक २० मे रोजी दुपारी ०५:०० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पथक अहमदनगर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा शहरातील हॉटेल सिध्दी जवळ पत्ते खेळणारे इसमांवर छापा टाकून, श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७४/२०२० भादंवि क. १२(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर कारवाई करुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर असताना पो.नि.दौलतराव जाधव यांना माहीती मिळाली की, श्रीगोंदा शहरात हॉटेल सृष्टी चे पाठीमागील बाजूस भिंतीचे आडोशाला काही इसम तिरट नावाचा हार जितीचा जुगार पैशावर खेळत आहेत. त्यावरुन सदर बाबत पो.नि. दौलतराव जाधव यांनी पोना पितळे व सपोनि राजेंद्र सानप,पोकॉ सुयोग सुपेकर, पोकॉ नामदेव सगर, पोकॉ किरण जाधव, मपोकॉ लता पुराणे अशांना माहीती देऊन पंचासह जाऊन छापा टाकला. यावेळी हॉटेल सृष्टीचे पाठीमागील बाजुस बसलेल्या इसमांवर कारवाई केली. घटनास्थळावरून ३ इसम पळून गेले व उर्वरीत ६ इसमांना पोलिसांनी जागीच पकडुन त्यांचेवर गु.र.नं. ४७५/२०२० मुं.जु.का.क.१२ (अ), भादंवि क.१८८, २६९, २७०, साथ रोग प्रतिबंधक कायदा कलम २, ३, ४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ४३ (१), १३९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सुमारे ४०३००/ – रु त्यात रोख रक्कम,जुगाराचे साधणे ,मोबाईल फोन असे जप्त केले.

त्याचा राग मनात धरुन सदर कारवाईचे वेळी हॉटेल सृष्टीच्या कारवाईचा मंगेश गांजुरे याला राग आल्याने, तुम्हाला पाहुन घेतो,तुमचे विरुध्द खोटे नाटे अर्ज करुन तुम्हाला गुंतवितो,वगैरे प्रमाणे बोलल्याने त्याबाबत पो.नि.दौलतराव जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस नोंद क्र. ०१ दिनांक २१ मे रोजी १:०२ वा स्वतः पितळे ठाणे अंमलदार असताना नोंद घेतली होती.

नंतर या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना टार्गेट करीत,पोना संदीप पितळे यांना दिनांक २२ मे रोजी २:५५ वाजता फोन करून पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्याबद्दल अरेरावी तसेच अश्लील भाषा वापरत स्थानिक पोलीस प्रशासनावर दडपशाही निर्माण केली. शासकीय कर्तव्यास अडथळा निर्माण केला असल्याने, बाबासाहेब भोस,श्रीगोंदा यांचे विरुध्द भा दं वि कलम ५०७ नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब भोस यांनी पोना संदीप पितळे यांना फोन करून जुगार वरील कारवाईची विचारपूस करीत पोनि जाधव यांच्याविरोधात अपशब्द वापरले..

पोना पितळे आणि बाबासाहेब भोस यांच्यातील फोनवरील संवाद:

बाबासाहेब भोस: बाबासाहेब भोस बोलतोय.

पोना पितळे: हा बोलाना साहेब .

बाबासाहेब भोस: तुम्ही तीन पाणी दाखल केली का रमी दाखल केली.

पोना पितळे: तिरट..तिरट

भोस: तिरट खेळत होते का.

पितळे: हा

भोस: तुमच्या आई बापाची शप्पथ खावुन सांगा बरं.

पितळे: अहो खेळत होते साहेब, तिथ धरलेले आहे त्यांना सगळे पत्ते वगैरे सगळं होत ना.

भोस: हे बघा महंमद बाबाच्या पांढरीत बोलताय हे तुम्ही

पितळे: मग खोट केल का

भोस: पितळे दादा आता फार झालयं, मी सकाळी साहेबांच्या तिथ गेलोय

पितळे: हं

भोस: तुम्ही या पध्दतीने वागत असाल तर, आता चार दोन दिवस | जावु द्या. माझा काय एक धंदा, कुटल काय नाहीए. पण तुम्ही अशा पध्दतीने वागताय ना .मला मान्य नाही अं, तुम्हाला मी एक सांगतोय आता |

पितळे: ऐका ना तुम्हाला चुकीची माहीती भेटलीये साहेब,तसा विषय नाहीए झालेला.

भोस: मला चुकीची माहीती नाही, मी सकाळीच तुमच्या पीआय विरुध्द ना.— आम्हाला माहीत म्हणुन आमच्यावर केलाय, मी…मी भेटलो ना पीआय ला जाधवला सकाळी.

पितळे: काय म्हटले साहेब ,

भोस: साहेब म्हटले ते गुन्ह्यात दाखल केलेले मोबाईल आम्ही सोडणार नाही , विचाराना त्या जाधवला जावुन

पितळे: ह

भोस: ते जाधवच, तहसीलदारचं, तुमच सगळ्यांच बाता. आम्ही | सर्व लॉकडाऊनची प्रक्रीया आम्ही पहातोय , उद्या तुम्ही अडचणीत आले तर माझेकडे येवु नका, तुम्ही फार … आणि पितळे तुम्ही स्वतः फार धोक्यात आहेअ. एक दिवस तुमची | | नोकरी जाईलअ, शहरात सगळे दोन नंबरचे धंदे, सगळ्यांची चौकशी आम्ही करणार आहे . पण उदाहरणार्थ | तुम्ही खुप जण अडचणीत येणार आहेअ. हे तुम्हाला मी सांगतोय. अहो मी जातो १२ वाजता त्या अशोक खेंडकेच्या दुकानी, हॉटेलमध्ये बसतो. मला काही कळत नाही का. माझे काय शे….. उपटनार आहे तुमचा पीआय, हॅलो..

पितळे: हा बोलाना |

भोस: हलो, पितळे साहेब मी माझा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल होता. | त्याप्रमाणे मी तुम्हाला मानतोय ,तुमची वळवळ वाढली ना.आता हा तुम्हाला शेवटचा फोन,याच्यानंतर मी तुम्हाला फोन | करणार नाही. |

पितळे: हं, तसा विषय नाही मी बोलतो वाटल ते साहेबांशी.|
फोन कट केला.

अशा प्रकारे स्थानिक राजकारणी पोलिसांवर दबाव आणताना या घटनेतून नमूद होत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here