Shevgaon : दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकाचे जिल्हा स्तरावर संकलन; शिक्षक परिषदेच्या मागणीला यश 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
सध्या राज्यात तसेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी व बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकाचे संकलन पुणे येथे न करता जिल्हास्तरावर होणार असल्याची माहिती शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे. 
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे दरवर्षी जमा कराव्या लागतात. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता बोर्डाने पोलिस विभागामार्फत ई-पास काढून उत्तरपत्रिका जमा कराव्या, असा आदेश काढला होता. मात्र, हे फार जिकिरीचे झाले होते.
याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित यांनी दिलीप थोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडे सदर बाजू मांडली. त्यानंतर दिलीप थोरे साहेब यांनी विभागीय अध्यक्ष सुपेसाहेब , सचिव बबन दहिफळे, व राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांचेशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर दहावी व बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकाचे संकलन जिल्हास्तरावर होणार आहे. याबाबत पुणे बोर्डाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार संकलन केले जाणार आहे. तसे वेळापत्रक सर्व शाळांना कळविले जाणार आहे , अशी माहिती तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे.
त्यामुळे बोर्डाच्या या निर्णयाचे शिक्षक परिषदेचे तुकाराम चिक्षे, सतिश जगदाळे, संदीप झाडे कारभारी लोणारी, सुधीर बढे, नितिन मालाणी, सत्यवान थोरे, सुधीर आपटे, प्रदीप बोरूडे, बाळासाहेब घावटे, देवीप्रसाद जोशी, ज्ञानदेव वंजारी, रवींद्र पवार, कन्हैया भंडारी, अभिषेक जोशी, राहुल ज्योतिक, अनिल ससाणे, निलेश मोरे, मुकुंद अंचवले, प्रदीप पांडव, अनिल दरंदले, हरिभाऊ कोथीबीरे, सविता म्हस्के, स्नेहा भारदे, सविता रोड़ी, पुष्पलता विरकर, वर्षा खिलारी, विनिता जोशी, शुभांगी थोरात, सरिता गायकवाड़,आदी पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here