Shevgaon : बॅंक ऑफ इंडियाच्या अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसरपदी स्नेहल घुले

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – तालुक्यातील रांजणी येथील स्नेहल काकासाहेब घुले ही आयबीपीएस परिक्षा उत्तीर्ण होऊन तिची बँक ऑफ इंडियाच्या अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड झाली आहे.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन प्रा. काकासाहेब घुले यांच्या त्या कन्या आहेत. स्नेहल हिने माध्यमिक शिक्षण रेसिडिन्शिअल माध्यमिक विदयालय शेवगाव येथून घेतले. बारामती जि. पुणे येथून कृषी पद्वीचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद येथे अभ्यास करून बँकेच्या आयबीपीएस परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात ऊर्तीर्ण होऊन यश मिळवले.या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, प्रा. भाऊसाहेब कचरे, दहिगाव-ने सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, रांजणीचे माजी संरपंच अरूण थोरात, उपसंरपंच राजेंद्र घुले यांनी अभिनंदन केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here