Rahuri : कोरोना विषाणू शिरकाव होण्याची भीती

1

देवळाली प्रवरात भाऊबंदकीच्या राजकारणातून ‘कोरोना’चा “सेतू’ कोसळला

राजेंद्र उंडे| प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

देवळाली प्रवरात ‘कोरोनो’ संसर्गजन्य आजारास रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात नाकाबंदी करुन बाहेरुन येणाऱ्या रुग्णास आडकाठी निर्माण केली. त्यामुळे ‘कोरोनो’ सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या संरक्षणासाठी ‘सेतू’ बांधला त्यामुळे शहराचा नागरिक सुरक्षित राहिला. नाकाबंदीच्या ठिकाणी वाद निर्माण झाले. भाऊबंदकीच्या वादात विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी उडी घेत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना हुकुमशाही करत असल्याचा आरोप केल्याने शहरातील लॉकडाऊनच्या काळातील नियंत्रण ठेवून स्वयंसेवक तरुण वर्गाने कोरोनाचा शिरकाव मोडीत काढला. परंतू भाऊबंदकीच्या राजकारणातून ‘कोरोना’चा ‘सेतू’ पूर्णपणे कोसळला आहे. स्वयंसेवकांनी नाकाबंदीवरील नियंञण काढून घेतल्याने. कोरोनाचा ‘सेतू’ कोसळल्याने मोठ्या शहरातील लोंढे राञी अपराञी शहरात गुपचूप दाखल होऊ लागल्याने कोरोनो विषाणू महारोगाचा शिरकाव होण्याची भीती जाणवू लागली आहे.

देशाला कोरोनो सारख्या संसर्गजन्य आजाराने वेठीस धरले देवळाली प्रवरात लॉकडाऊन काळात नाकाबंदी सह विविध उपाय योजना राबविल्या गेल्या याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी घेऊन इतर शहरांनी त्या प्रमाणे कार्यवाही केल्यास कोणत्याही शहरात शिरकाव होणार नाही. असे अनेक वेळा सांगितले. परंतू लॉकडाऊन सुरु झाल्या नंतर लॉकडाऊनच्या नियमाचे कठोरपणे राबविण्यास सुरवात झाली. यातून काही असंतूष्ठ नागरिक दुखावले गेले. राष्ट्रवादीचे अजित कदम यांचा मुलगा पुण्यावरुन आल्याने त्यास होम क्वारंटाइन होण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने नगराध्यक्षांवर चुलत भावासह चुलत्याने भाऊबंदकी पेटवली. त्यात नागरिकांनी भाऊबंदकीचा वाद नाकाबंदीवर पेटल्यावर त्यात तेल टाकण्याचा प्रयत्न केला, असे सर्वसामान्य नागरीक चर्चा करताना बोलत आहे.

भाऊबंदकीच्या वादात विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी उडी घेऊन दुखावलेल्या नागरिकांचे दाखले देऊन नगराध्यक्ष सत्यजित कदम शहरातील नागरिकांवर कशी हुकुमशाही गाजवत आहे. हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. नाकाबंदीच्या काही ठिकाणी स्वयसेवकांस दिलेल्या अधिकाराचा वापराचा अतिरेक झाला. तोच धागा पकडून सर्वपक्षीय विरोधकांनी नगराध्यक्ष कदम यांना हुकुमशाही संबोधले आहे.नगराध्यक्ष कदम यांच्या विरोधात तहसिलदार यांना निवेदन देवून नगराध्यक्ष कदम यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.झालेही तसेच नगराध्यक्ष कदम यांच्यासह स्वयंसेवक नाराज झाले.नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन पदाचा राजीनामा देवून बाजूला झाले.परंतू त्यापुर्वी स्वयंसेवकांनी नाकाबंदीच्या ठिकाणी नाकाबंदी करणे बंद केले.लाँकडाऊन काळात स्वयंसेवक, माजी सैनिक यांनी खरोखर चांगले काम केले.असे एका पोलिस अधिकाऱ्याने मान्य केले.परंतू काही चुका त्यांच्या कडून झाल्या आहेत.त्या चुकांचा फायदा विरोधकांनी उचलला आहे.

सर्वपक्षीय विरोधकांनी पञकार परीषद घेऊन नगराध्यक्ष कदम यांच्यावर निशान साधला. परखड टीका करुनही नगराध्यक्ष कदम यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले नाही. त्याचा फायदा घेऊन माऊथ पब्लिसिटी करण्यात सर्वपक्षीय विरोधक अग्रेसर राहिले. त्यामुळे नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन पदाचा राजीनामा तहसिलदार यांच्याकडे दिला. राजीनामा देताना माञ माझ्यासह विरोधकांना क्वारंटाईन करावे, अशी मागणीही केली. राजकारणातील विझलेली चूल पुन्हा पेटती केली. राजकारणातील चुली पेटल्या आहेत. त्या मागे वर्षभरावर नगर पालिका निवडणूका आल्या आहेत. सत्ताधाऱ्याबरोबर विरोधकही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत राहणार आहे. राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य अजित कदम, चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष  व विखे समर्थक गणेश भांड, रिपाइचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र थोरात, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल कराळे, नगरसेवक शैलेंद्रकुमार कदम,नानासाहेब कदम, रावसाहेब मुसमाडे आदी विरोधकांनी  मोट बांधुन नगराध्यक्ष कदम यांच्यावर निशाना साधला आहे.

लॉकडाऊनच्या कामात व गोरगरीबांना दोन वेळचे जेवण पुरविण्यात व्यस्त असताना विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणीस सुरवात केली आहे.राजकीय कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना,रिपाइ,विखेगट,काँग्रेस ,राष्ट्रवादी आदी पक्षातील नेते एकञ आले आहेत.नगराध्यक्ष आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली हुकुमशाही करीत असल्याचा आरोप विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी केला. नगराध्यक्ष यांच्यावर आरोप करताना पालिका कामगारांनाही त्यात ओढण्यात आले.कामगार संघटनेने तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवून विरोधी सर्वपक्षीय यांनी जे आरोप केले आहेत ते पुराव्यानिशी सिद्ध करावे अशी मागणी केली.

भाऊबंदकीच्या राजकारणातून ‘कोरोना’चा ‘सेतू’ पुर्णपणे कोसळला आहे. स्वयंसेवकांनी नाकाबंदी वरील नियंञण काढुण घेतल्याने. कोरोनाचा ‘सेतू’ कोसळल्याने पुणे, मुंबई , मालेगाव, नाशिक आदीसह इतर  शहरातील  लोंढे राञी अपराञी शहरात गुपचुप दाखल होवू  लागल्याने कोरोनो विषाणू महारोगाचा शिरकाव होण्याची भीती जाणवू लागली आहे.

देवळाली प्रवरा शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर पुन्हा नाकेबंदी चालू करण्यासाठी स्वयंसेवकांच्या व माजी सैनिकांच्या बैठका घेण्यात येत असून विरोधकांनी केलेल्या आरोपाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अखेर नगराध्यक्ष कदम यांनी स्वयंसेवकांची व माजी सैनिकांची समजूत काढण्यात यश मिळविले. दिवसभर नगरपालिका कर्मचारी नाकाबंदी सांभाळणार तर राञीच्या वेळी स्वयंसेवक नाकाबंदी सांभाळणार आहेत.त्यामुळे शहरातून येणारा नागरीक देवळाली प्रवरात परस्पर येऊ शकत नाही.

रक्ताच्या नात्यापेक्षा, प्रेमाचे लोक हेच माझे  कुटुंब आहे ; कदम
भाऊबंदकीच्या आडून विरोधी सर्वपक्षीय नेते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहे.केलेल्या आरोपाला एका शब्दाने प्रतिउत्तर दिले नाही.कोरोना सारखा महाभयंकर संसर्गजन्य आजार रोखण्यात सफल होत असताना आरोप केले जात आहे. कडक अंमलबजावणीचा  काही विघ्नसंतुष्ठ लोकांना ञास होवू लागला होता. नगरपालिकेचा नगराध्यक्ष या नात्याने नागरीकांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला आहे.देवळाली प्रवरा सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागून पावले उचलावी लागतील माझ्या द्रुष्टीने सर्वजण समान आहेत. मी भाऊबंदकी, पाटील पाहत नाही.रक्ताचे नाते कधीही मोजले नाही,जे माझ्यावर प्रेम करतात तेच माझे कुटुंब आहे.
सत्यजित पाटील कदम
नगराध्यक्ष  देवळाली प्रवरा नगर पालिका

राहुरीच्या पञव्यवहारा शिवाय  मुख्यमंञ्यांना दुसरे काम नाही; सरोदे
राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी  सत्ताधारी जे ते  आपल्यापरीने  वरीष्ठ पातळी वरुन प्रयत्न करत असतात . तालुक्यातील स्वयंघोषीत सगळीकडे उडणारा  हनुमान याने सध्या तालुक्यातील जो प्रश्न सुटणार आहे . त्याची माहिती गोळा करायची त्याच प्रश्नाचे निवेदन तयार करुन  मुख्यमंञ्याकडे  निवेदनवजा अर्ज दाखल  करुन  सुटणाऱ्या प्रश्नाचे श्रेय लाटीत आहे .त्याची प्रसिद्धी सोशल मिडीयावर  करुन मीच प्रश्न सोडविला आहे असे भासवत आहे. मुख्यमंञ्यांना राहुरीच्या पञव्यवहारावर निर्णय घेण्या शिवाय दुसरे कोणतेही काम नाही. मुख्यमंञी यांनी विविध खात्यांचे मंञी व आमदार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सर्वञ  उडणारा हनुमानाच्या अर्ज व निवेदनावर निर्णय घेण्याशिवाय दुसरे कोणते काम नाही .
      छायाताई सरोदे                         
माजी नगरसेविका

राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य अजित कदम यांच्या मोबाईलवर दिवसभरात पाच ते सहा वेळा संपर्क साधला परंतू  त्यांनी मोबाईल घेण्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजली नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here