!!भास्करायणः२!!
सरकारी पॕकेज,की सावकारी

4

Rashtra Sahyadri Updates…
पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करणेसाठी २० लाख कोटिचे पॕकेज जाहिर केले, हे स्वागतार्ह आहे. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १०% इतकी पॕकेजची रक्कम आहे. याचा अर्थ देशाचे सकल उत्पन्न दोनशे लाख कोटी इतके गृहित धरले आहे. जगातील बहुतांश देशांनी सकल उत्पन्नाच्या तीन ते तीस टक्के इतके पॕकेज आपापल्या देशासाठी जाहिर केले आहे. या तुलनेत पंतप्रधानांनी दिलेले पॕकेज भरीव नसले, तरी समाधानकारक ठरते. कोरोनामुळे विकासदर (जी.डी.पी.) पुढिल तीन वर्षे पाच टक्क्यांहून एक ते शून्य टक्केपर्यन्त घसरण्याची भिती अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. या पार्वभूमिवर अर्थव्यवस्थेला पॕकेजच्या टाॕनिकची गरजच होती.
पंतप्रधान व अर्थमंञी निर्मला सितारामन यांनी पॕकेजचे स्वरुप स्पष्ट करताना “आत्मनिर्भर भारत “संकल्पना मांडली. तीसुध्दा प्रेरणादायी आहे. कारण खेड्याकडे चला व स्वावलंबी बना हा महात्मा गांधी यांचा मूलमंञ यात दडलाय.तथापि,अनेकजणांनी पॕकेजमुळे भारत जणू उद्याच आत्मनिर्भर बनेल , या अविर्भावात प्रतिक्रिया दिल्या. हे करताना पारंपारिक विरोकांची टवाळकी करायला हे समर्थक विसरले नाही. असो.
आता पॕकेजकडे येवू, २० लाख कोटिचे पॕकेज खोलात जावून समजून घेतले तर बराच उलगडा होईल. वीस लाख कोटी पॕकेजच्या घोषणेपूर्वीच रिझर्व बँकने केन्द्र सरकारला २.८ लाख कोटी, मार्च महिन्यात सरकारला दिलेले आणखी ३.७४ लाख कोटी,लाॕकडाऊन कालाकरिता मदत म्हणून १.७ लाख कोटी, म्युचुअल फंडासाठी ५० हजार कोटी असे १० लाख कोटी यापूर्वीच वितरित केले आहेत. सदरच्या पॕकेजपूर्व वितरित झालेल्या रकमा धरुन पॕकेज प्रत्यक्षात १० लाख कोटीचे उरते, हे प्रथमतः ध्यानात घेतले पाहिजे.
या पॕकेजनुसार व अर्थमंञ्यांच्या पञकार परिषदेतील विवेचनानुसार पॕकेजमधील मोठा वाटा हा मध्यम व लघु उद्योगांसाठी आहे. यात ८० टक्के लघु व २० टक्के असे मिळून, मध्यम उद्योगांना सुमारे ३लाख ७० हजार कोटी इतका वाटा जाणार आहे. संघटित व असंघटित कामगारांनाही अर्थसहाय्य दिले जाणार आहे.माञ याबाबत स्पष्टता व नेमकेपण नसल्याने विश्लेषण अवघड आहे. तथापि,मजुरांना व स्थलांतरितांना थेट रोख स्वरुपात मदतीचे आश्वासन दिले गेले आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.


या पॕकेजचा सध्याचा हेतू हा लोकांच्या हातात पैसा जावून लाभार्थीचे दरडोई उत्पन्नात वाढ करणे, जेणेकरुन त्यांची खरेदीक्षमता वाढावी. त्याव्दारे बाजारपेठेत पैसे येवून व्यापाराला चालना मिळावी, हा आहे.

बांधकाम व उभारणी क्षेञातील २०० कोटी रकमेपर्यन्तच्या कामाच्या निविदा भरण्यास परकीय कंपन्यांना मज्जाव, हा कल्पक व परिणामकारक निर्णय. यामुळे देशात कुशल मजूर तयार होण्यास वाव मिळून देशातला पैसा देशातच खेळेल.माञ यात गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर येईल.स्थानिक ठेकेदारांची आर्थिक क्षमता व कुशलता याबाबत साशंकता आहे. परकिय ठेकेदारांना मज्जाव करताना स्थानिक कौशल्यवाढिचे व गुणवत्ता राखण्याची कसरत करावी लागणार आहे. भ्रष्टाचाराला सोकलेल्या शासनयंञणेला हे कितपत रुजेल, हे देखिल शासनाला बघावे लागेल.


लघु उद्योगाबाबतच्या धोरणाबाबत विचार करताना सरकारला ८ लाख कोटीचे मागील थकीत देणे चुकवायचे आहे, हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मध्यम व लघु उद्योगाला ३कोटी ७० लाखाचे अर्थसहाय्य उभारी देईल कां, अशी शंका आहे. दुसरे असे की, लघु व मध्यम उद्योग हे परप्रांतीय मजुरांच्या श्रम व कौशल्यावर चालतात. या क्षेञातील जवळपास ७५% मजुरांनी गावाकडे धाव घेतली आहे.त्यांना आहे तेथेच रोखून धरण्यात केन्द्र व राज्य सरकारे अपयशी ठरली आहे. लघु उद्योगासाठी कुशल मजुराची अनुपलब्धता हि मोठी जटील समस्या ठरणार नाही. अशास्थितीत मजुराअभावी उद्योग सुरु करणे अंधारात उडी मारणे ठरणार आहे. त्यामुळे लघु व मध्यम उद्योग पॕकेजमुळे सावरतील असे वाटत नाही.

परकीय चलन वाचवून देशांतर्गत अर्थव्यवस्था सशक्त करण्यासाठी, कमीत कमी आयात व जास्तीत जास्त स्वदेशीचा वापर,यातून देशाचे परकीय चलन वाचवून गंगाजळी वाढविण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट दिसतो.सरकारने पॕकेज जाहिर करताना अनावश्यक अनुदाने घटवावीत आणि उत्पादकतावाढ, आधुनिकिकरण,आधुनिक तंञज्ञानासाठीची

अनुदाने भरीव प्रमाणात वाढवावीत,यावर काहिच भाष्य केले नाही,हे खटकते.
एकूणच आत्ता जे पॕकेज दिले आहे किंवा त्याचे जे स्वरुप आहे त्यावरुन सदरचे पॕकेज हे अर्थसहाय्य नसून, मध्यम वा दिर्घ कर्जस्वरुपात असणार आहे.हे ध्यानात घेता पॕकेजच्या मर्यादा लक्षात येतात.
पंतप्रधान व अर्थमंञ्यांनी जाहिर केलेले पॕकेज हे सद्य आर्थिक मंदिच्या काळात दिलासादायक आहे.तथापि ,सद्यस्थितीतील संकटात ते अर्थव्यवस्थेस उभारी देईल कां,याचे उत्तर येणारा काळ ठरवेल, जो केन्द्र व राज्य शासनासाठी नक्कीच आव्हानाचा असेल इतकेच. (क्रमशः)

भास्कर खंडागळें ,बेलापूर

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here