Education : Pune : विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईनच; विद्याशाखांच्या नेमलेल्या समितीनुसार निर्णय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री यांनी कोरोनामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत केवळ पदवी व पद्व्यूत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा होणार आहेत, असे जाहीर केले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षा होणार याबाबत सांगितले होते. या परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. साधारणपणे जुलैमध्ये या परीक्षा होतील. 

अंतिम सत्राच्या एकूण अभ्यासक्रमातील 30 टक्के भागाचे ई साहित्य निर्माण करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबाबत परिक्षपत्रक जारी केल होते. यामध्य त्यांनी म्हटले होते की, “विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणांची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समितींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here