Beed : Breaking crime news : कौटुंबिक वादातून पत्नीसह मुलांची हत्या; पतीला अटक

0
घरात आढळले मृतदेह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | शितल कुमार जाधव 

बीड – कौटुंबिक वादातून पत्नीसह मुलांची हत्या केल्याची घटना घडली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली. ही घटना आज रविवारी भर दुपारी शुक्रवार पेठ या भागात घडली.

संगीता संतोष कोकणे, मयूर संतोष कोकणे (वय सात) संदेश संतोष कोकणे, अशी मयतांची नावे असून संतोष कोकणे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील कोकणे कुटुंबात संगीता कोकणे, मयूर कोकणे, संदेश कोकणे यांचा मृतदेह आढळला. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. संगीता संतोष कोकणे हिचा मृतदेह त्याच्या खोली मध्ये सापडला असून संदेश संतोष कोकणे त्याचा मृतदेह घरात सापडला असून मयूर संतोष कोकणे वय सात वर्ष याचा मृतदेह पाण्याच्या बॅनर मध्ये आढळून आला.

आरोपी पती संतोष कोकणे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here