Ahmednagar : Corona Breaking news : आणखी 04 जणांना कोरोनाची लागण; निमोण येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा नाशिकमध्ये मृत्यू

राहुरी तालुक्यातील वांबोरी, कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, श्रीरापूर तालुक्यातील वडाळा महादेव, नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह; हे चारही रुग्ण जिल्हा बाहेरून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 74 झाली आहे.

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अहमदनगर – बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या ०४ जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या होत्या. तसेच संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा काल रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ०७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७४ असून जिल्ह्याबाहेरील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, घाटकोपर येथील महिलेचा रिपीट अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. इतर १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सकाळी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यातील एक २६ वर्षीय व्यक्ती १७ मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी ६० वर्षीय बाधीतव्यक्ती तुर्भे, मुंबई येथून२२ मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती. तिसरी ३२ वर्षीय बाधीत व्यक्ती औरंगाबाद येथून २० मे रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आली होती. नेवासा बु. येथे २२ मे रोजी उल्हासनगर येथून आलेल्या ६० वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला.नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here