Shrigonda : मांजर बोक्यांच्या भांडणात जीव गेला लांडग्याचा

पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांची अखेर बदली!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील राजकिय नेत्याने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज विभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या मध्यस्थीने संदीप पितळे यांचीअखेर बदली करण्यात आली आणि वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे बोक्यांच्या भांडणात जीव गेला लांडग्याचा, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

मागील काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्याबद्दल बाबासाहेब भोस आणि आण्णासाहेब शेलार यांनी एकत्र येऊन पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे याना फोन करून अर्वाच्च भाषा वापरली. पितळे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून पितळे यांनी स्वतः फिर्यादी होत बाबासाहेब भोस यांच्यावर गुन्हा दाखल केला.
त्यानंतर राजकीय वावटळ आले आणि बैठकीला उधाण आले. त्यातून विभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव , घनश्याम शेलार ,आण्णासाहेब शेलार विजय मचे, दीपक पाटील भोसले यांच्यासह बाबासाहेब भोस यांच्यात तीन वेळा मिटिंग होऊन पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे यांची बदली करू मग सर्व प्रकरण मिटेल असे ठरले त्यानुसार त्यांची कर्जत येथे बदली करण्यात आली मात्र त्यामुळे मांजर बोक्यांच्या भांडणात जीव गेला लांडग्याचा असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

नियोजित पत्रकार परिषद रद्द
काल सायंकाळी सर्व पत्रकार बंधूंना उद्या सकाळी10 वाजता पत्रकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, मिटिंग मध्ये सर्व काही अलबेल ठरल्यामुळे बाबासाहेब भोस यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द नसल्याने त्यांनी नियोजित पत्रकार परिषद रद्द केली.

विभागीय पोलीस अधीक्षक यांची कारवाई 
बाबासाहेब भोस यांच्यावर संदीप पितळे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावध भूमिका घेत विभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांनी संदीप पितळे यांची कर्जत या ठिकाणी बदली केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here