Shrigonda : श्रीरामपूर येथे सापडलेला कोरोना बाधित महाराज श्रीगोंद्यात होता वास्तव्यास; तालुक्यात भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – श्रीरामपूर येथून श्रीगोंद्यात आपल्या भक्ताकडे भेटीसाठी आलेला एक महाराज श्रीरामपूर याठिकाणी कोरोना बाधित सापडला असल्यामुळे श्रीगोंदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणावरून श्रीगोंद्यातील आपल्या डॉक्टर भक्ताला भेटण्यासाठी एक महाराज श्रीगोंद्यात आला होता. त्यानंतर तो श्रीगोंद्यात काही दिवस वास्तव्यास होता. त्यावेळी अनेक भक्तांनी त्याची भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
महाराज ज्या डॉक्टरकडे वास्तव्यास होता त्या डॉक्टरचे घर हॉस्पिटल पूर्णपणे प्रशासनाने सील केले असून डॉक्टरच्या घरातील लोकांनाही होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. मात्र, श्रीरामपूर येथून श्रीगोंद्यात 21 मार्च रोजी आलेला महाराज श्रीगोंद्यातून परत श्रीरामपूरला गेल्यानंतर कोरोनाबाधित निघाल्याने श्रीगोंद्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीमुळे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने योग्य त्या खबरदारी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here