Beed : शहरातील अंकुश नगर भागात जनतेची आरोग्य तपासणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड : शहरातील अंकुश नगर भागात जनतेची आरोग्य तपासणी बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये आज आरोग्य तपासणी करण्यात आली. दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे जिल्हा प्रतिनिधी शितल कुमार जाधव हे उपस्थित असून त्यांच्या सर्व भागातील जनतेची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. बीड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये आरोग्य तपासणी चालू आहे. डॉक्टर जाधव विकास बामणे संध्या राजपूत हे अहोरात्र परिश्रम करत असून आतापर्यंत शहरातील एक लाखाच्या पुढे जनतेची आरोग्य तपासणी त्यांनी केली. आज दिनांक 24 रोजी शहरातील अंकुश नगर भागातील शिक्षक कॉलनी हनुमान मंदिर परिसर या भागामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आले.

या तपासणीमध्ये एकही पेशंट किंवा रुग्ण आढळून आला नाही. आरोग्य तपासणी मध्ये जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असून अशा तपासण्या प्रशासनामार्फत करण्यात यायला पाहिजेत. अशी मागणी जनतेकडून होत आहे. मात्र, असे न होता डॉक्टर जाधव विकास बामणे संध्याताई राजपूत यांची टीम अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेची आरोग्य तपासणी करत आहेत. या कामगिरीबद्दल त्यांचे जनतेकडून सर्वत्र कौतुक होत आहे. दैनिक राष्ट्र सह्याद्रीतर्फे जनतेला आव्हान करण्यात येत आहे की आपण घरातच रहा स्वतःची काळजी घ्या. आपणच आपले रक्षक आहोत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here