Shrirampur: दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह; श्रीरामपूरकरांची चिंता वाढली..!

0

माळवाडगांव प्रतिनिधी/संदिप आसने

: दोन महिने कडेकोट लॉक डाउन आणि सोशल डिस्टनसिंग पाळणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यात सलग दोन दिवसात दोन कोरोना रुग्ण सापडले.
विशेष म्हणजे हे दोन्ही रुग्ण वडाळा महादेव या एकाच गावातील असले तरी त्यांचा परस्पर संबंध नाही. पहिला रुग्ण औरंगाबादेतून आला असून आज बाधित संपलेला रुग्ण पत्नीसह मुंबईतून आला होता.


श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.

गेल्या आठवड्यामध्ये सदर तरुण मुंबई येथून वडाळा महादेव येथे आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांच्यावतीने बाहेरून आलेल्या व्यक्तींना शाळेमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यातील दोन तरुणांना शनिवार दिनांक २३ मे रोजी त्रास होऊ लागल्याने प्राथमिक उपाय म्हणून त्यांना नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. त्या दोन्ही तरुणांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील एका तरुणाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याचे निदर्शनास आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने श्रीरामपुर तालुका तसेच परिसरात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. सलग दुसऱ्या दिवशी दुसरा कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तालुक्यासह वडाळा महादेव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here