Shrirampur : माजी मंत्री गोविंदरावजी आदिकांच्या पुण्यस्मरणानिमित्त 10,000 गरजूंना किराणा किट वाटप करणार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – राज्याचे माजी मंत्री गोविंदरावजी आदिक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे सर्व कार्यक्रम रद्द करून श्रीरामपूर शहरातील दहा हजार गरजू कुटुंबांना किराणा किट देणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष तथा कृषक समाज संघटनेच्या अध्यक्ष अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी दिली. 

माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी आदीक परिवाराच्या वतीने हृदयरोग तपासणी शिबिर व नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. यामध्ये गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, यावर्षी पाचव्या पुण्यासमरणानिमित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजूंना 10000 किराणा किट वाटप करण्यात येणार आहे. श्रीरामपूर शहरातील प्रत्येक भागांमध्ये गरजूंना हे किट वाटप करण्यात येणार असल्याचे आदिक परिवाराने सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here