Shevgaon : लॉकडाऊनच्या काळात एचआयव्ही बाधितांना औषध पोहोचवणारी ‘धन्वंतरी’

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक ज्ञात-अज्ञातांनी आपापल्या परीने समाज बांधवांना मदत करण्याचे कार्य केले आहे. असेच कार्य एचआयव्ही सारख्या दूर्धर आजाराने त्रस्त असणा-या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही (एनएमपी) ही संस्था करते. या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विहान प्रकल्पाच्या क्षेत्रीय कार्यकर्त्या संगीता दराडे यांनी एचआयव्ही बाधितांसाठी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. या काळात  घरादाराची व स्वतःची काळजी न करता या सेवाभावी कार्यात अहोरात्र झोकून देऊन काम केल्याबद्दल त्यांना सॅलूट करायला हवा, असे हे कार्य आहे.

शेवगाव परिसरात असलेल्या अनेक एचआयव्ही बाधितांना त्यांच्या स्टेजनुसार नगर, पुणे व मुंबईहून संस्थेद्वारे औषध उपलब्ध केले जाते. हे औषध घेताना खंड पडून चालत नाही. क्षेत्रिय कार्यकर्त्या दराडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हे औषध सर्व संबंधीतांना वेळेत घरपोच केले आहे.

एचआयव्ही रुग्णांना अॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी हे औषध दर महिन्याला न चूकता घ्यावे लागते. वाहनांची सोय नसतानाही  संगीता दराडे यांनी या रूग्ण सेवेत खंड पडू न देता औषध घरपोहोच केली आहेत. या काळात या रुग्णांसाठी दराडे देवदूतच ठरत्या आहेत. यावेळी त्यांना परिसरातील ग्रामोण रुग्णालयाची मदत झाली. रुग्णांच्या जवळील कोणत्या आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध मिळू शकेल याचीही माहिती त्यांनी रुग्णांना दिली. तसेच वेळोवेळी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेऊन औषध मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दराडे यांना या कामी प्रकल्प संचालक प्रशांत येंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here