Ahmednagar : कोरोनाचे संकट टळू दे; मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे करुणा भाकली

0

सामूहिक कार्यक्रमांना फाटा देऊन घरीच ईद उत्साहात साजरी 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नगर – मुस्लिम बांधवांनी आज सरकारच्या आवाहनानुसार घरीच नमाज अदा करून अल्लाहकडे कोरोनाचे संकट टळू दे, सुखशांती नांदू दे अशी करुणा भाकली. सामूहिक नमाज न पढता अशा पद्धतीने उत्साहात पण घरीच रमझान ईद साजरी झाली.

एरव्ही ईदगाह मैदानावर जमून सामूहिकरीत्या नमाज पडण्याची रीत होती. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठाण करण्यास परवानगी नाकारल्याने मुस्लिम बांधवांनी ही सरकारने केलेल्या आवाहनास अनुकूल प्रतिसाद दिला. मात्र, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

मुस्लिम बांधवांनी आज घरीच नमाज अदा करून फातेहा मागितली. त्यानंतर अनेकांनी फोनवरून, व्हिडीओकॉल करून आपल्या आप्त-इष्ट जणांना रमझान ईदच्या शुभेछा देऊन ख्याली खुशालीची चौकशी केली. मात्र, यंदा दरवर्षी सारख्या शिरखुर्म्याच्या मेजवान्या झाल्या नाहीत. मात्र, त्या बदल्यात एकमेकांच्या आरोग्याची दुवा अल्लाहकडे मागण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सध्या सामूहिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने यंदा सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम रद्द झाल्याने घरीच ईद साजरी केली. सरकारने केलेल्या आवाहनानुसार नमाज पठाण करून करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आल्याचे मन्सूर शेख यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here