Shirurkasar : कोरोनाबाधीत महिलेचा पती गावी येऊन गेल्याने तालुक्याचा जीव टांगणीला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शिरूरकासार – तालुक्याच्या चोहू बाजूने असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोना रूग्ण सापडल्यामुळे तालुक्यातील जीव आता टांगणीला लागला आहे. शिरुर पासून अवघ्या 17 किमी अंतर असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर (पांगुळ) या ठिकाणी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. मुंबईवरून आलेल्या या महिलेचा पती शिरूर तालुक्यातील पिंपळनेर(गणेश वस्ती) या ठिकाणी येऊन गेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने चालला असून गेली आठ दिवसांत आकडा चाळीसीच्या पुढे जाऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, बीड, माजलगाव, केज, धारूर, वडवणी या आठ तालुक्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. शिरूरकासार, परळी अंबाजोगाई या तालुक्यात रूग्ण सापडले नसले तरी चोहू बाजूने कोरोनाने
तिन तालुक्यांना घेरले आहे.

कोरोनाच्या वेगाने होत असलेल्या फैलावाने भितीदायक वातावरण पसरलेले असून शिरूरकासार येथून जवळच असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर(पांगुळ) या ठिकाणी मुंबई वरून एक जण पत्नीला माहेरी घेऊन आला तेथे तिला सोडल्यानंतर तो शिरूरकासार तालुक्यातील आपल्या( गणेश वस्ती) पिंपळनेर या ठिकाणी रात्रभर राहून परत मुंबईला गेला. तद्नंतर गरोदर असलेल्या पत्नीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पाथर्डीला नेण्यात आले. तिचा स्वॅब घेतल्यानंतर ती कोरोना बाधीत असल्याचे आढळले. तिच्यावर नगरमध्ये उपचार सुरू असून पती शिरुरकासार तालुक्यातील पिंपळनेर (गणेश वस्ती) आपल्या गावी येऊन गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळे व पथकाने घरी जाऊन कुटूंबाला क्वारंटाईन होण्यास भाग पाडले. चोहु बाजूने कोरोनाने घेरल्याने सध्या तरी तालुक्यातील जनतेचा जीव टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here