अहमदनगर येथील महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया परशाला केले जेरबंद

अहमदनगर सायबर सेल पोलिसांची कामगिरी

अहमदनगर : चित्रपट सैराट फेम अभिनेता परशा उर्फ आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकला बनावट खाते उघडून अहमदनगर शहरातील महिलेची फसवणूक करणार्‍या तोतयाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली आहे. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवडी, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली असून एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी या बनावट परशाकडून जप्त केला आहे.

एमआयडीसी येथे या महिलेचा चार महिन्यापूर्वी फेसबुकवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला. पिंपरी-चिंचवड येथील शिवदर्शन हे खाते चालवत होता.

याच खात्यावरून त्याने अहमदनगरमधील महिलेशी मैत्री वाढवली. आर्थिक अडचण असल्याचा बहाणा करत त्याने महिलेकडून मंगळसूत्र आणि एक अंगठी नगरला येऊन घेतली. सदर फेसबुक अकाऊंट बंद झाल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर नगरच्या सायबर सेलने प्रकरणाचा छडा लावत पिंपरी-चिंचवड मधून तोतया परशा अर्थात आरोपी शिवदर्शनला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here