तब्बल दोन महिन्यानंतर बीड शहरात संचारबंदी उठवली मात्र नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष

0

बीड। राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी

तब्बल दोन महिन्यानंतर बीड शहरात संचारबंदी उठवली असून सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत शिथिल केली आहे. दोन महिन्यानंतर बीड शहरातील दारूचे दुकाने व वाईन शॉप उघडले असून दारूची विक्री चालू करण्यात आली आहे. आज बीड शहरामध्ये सकाळपासून वाईन शॉप वर व दारू दुकानावर तुफान गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या परीने लोक सोशल डिस्टन्स इंग चे पालन करीत असल्याचे दिसून आले.

बीड जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांनी परिपत्रक काढून शहरातील संचारबंदी बाबत सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत संचारबंदी शिथिल केलेले आहे. सर्व दुकानदारांना काही सूचना चे पालन करण्यासाठी सांगितले आहे. वाईन शॉप व इतर दुकाना समोर सूचना चे फलक लावण्यात यावे पण दारू दुकानदारांनी सूचना फलक लावले नसल्यास दुकानावर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतानासुद्धा वाईन शॉप दुकानासमोर सूचना फलक लावलेले दिसून आले नाही.

दुकानदाराने सूचनेचे पालन काटेकोरपणे करावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे वाईन शॉप च्या दुकानाच्या रांगेत पाच लोक उभे राहणे बंधनकारक आहे. इतर जास्त लोक असल्यास कारवाई करण्यात येईल येईल असे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here