श्रीरामपूर प्रशासनाची दादागिरी, विनाकारण रस्ता केला बंद.

श्रीरामपूर । प्रतिनिधी

शहरातील सर्व बाजारपेठ सुरु झालेली असताना आणि सर्व रस्ते खुले केलेले असताना सय्यद बाबा चौकातील लॉक डाऊन मात्र कायम आहे . याचा गोंधवणी भागातून येणारे तसेच वार्ड नंबर 2 मधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . दोन फुटाचे अंतरासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे .

ज्या लोकांना शहरांमध्ये जायचे आहे त्यांना जावेच लागते . परंतु पलीकडे जाण्यासाठी सय्यद बाबा चौकात धान्य गोडाऊन समोर रस्ता बंद केला आहे . तो खुला न केल्यामुळे लोकांना फार मोठा वळसा घालून पुन्हा तिथेच यावे लागते . कोणाच्या सांगण्यावरून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा . जनतेची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता त्वरित चालू करावा अशी मागणी त्रस्त जनतेने केली आहे . शहरातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, पोलीस प्रशासन या सर्वांनी या बाबीची तातडीने दखल घ्यावी. हा रस्ता बंद केल्याने लोकांची गैरसोय होत असून ज्यांना शहरांमध्ये काम आहे अशा लोकांना जाण्यासाठी हा रस्ता चालू करणे आवश्यक आहे. प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर हा रस्ता बंद ठेवत आहे हे मात्र कळत नाही. गेले दोन महिने हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन सारखा बंद ठेवण्यात आलेला आहे. तो तातडीने सुरू करावा. प्रशासनाने आपली मनमानी करू नये. अशी अपेक्षा या भागातील जनतेने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here