Analysis..!!भास्करायण:४!!
धन्याला धत्तुरा,चोराला मलिदा!!

2

Rashtra sahyadri special…


आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. किमान तसे उठता बसता आपले राजकारणी भाषणातून सांगत असतात. शेतक-यांचे बळीराजा असे गोंडस नामकरण करुन बारसेही घालण्यात आले. प्रत्यक्षात हा देश मूठभर धनिकांचा आहे. येथील व्यवस्था हि शोषणाची आहे. शेतकरी हा या शोषण व्यवस्थेचा बळी ठरतो किंवा त्याचा जाणूनबुजून बळी दिला जातो.

देशाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून असल्याचे राज्यकर्ते सांगतात. तर अर्थतज्ञ हे शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे आवर्जून सांगत असतात. प्रत्यक्षात या देशात शेतक-यांइतकी कोणाचीच दूरवस्था होताना दिसत नाही. एकीकडे शेतक-यांना निवडणूकीपुरते भूलवायचे, आणि सत्ता मिळताच नागवायचे ही राजकारण्यांची अघोरी निती आहे.

शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, तसेच शेतमालाला उत्पादन खर्च आधारीत भाव मिळावेत, आशी मागणी सातत्याने केली जाते. सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान शेतीसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या जातील, असे विद्यमान सरकारने आश्वासन दिले. शेतक-यांनीही आशेवर राहून सत्तापरिवर्तन घडविले. पण सत्ता मिळताच उत्पादन खर्च आधिक पन्नास टके नफा धरुन शेतमालाला भाव या घोषाणेची.’ बाबा जेवले पञवाळ्या पालथ्या’ अशी शोकांतिका झाली!
शेतीची उत्पादकता कमालिची घटली,आहे. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळच जमत नाही. शेतमालाला शाश्वत भाव मिळत नसल्याने शेती हा आतबट्याचा खेळ झालायगेल्या राज्य सरकारने शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची वल्गना केली. त्याचे पुढे काय झाले,हे शेतक-यांनी अनुभवले आणि राज्यात पुन्हा सत्तापरिवर्तन घडविले. शेती हा निसर्गाधिरित व्यवसाय आहे.सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा अस्मानी संकटांचा, ससेमिरा शेतक-यांच्या मागे लागला आहे. त्यामुळे शेतकरी अस्मानी बरोबरच सुल्तानीचाही बळी ठरत आहे.

देशाच्या आर्थिक पाहणी अहवालाने शेतक-यांच्या दूरव्यस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. देशातील १२कोटी कुटुंबे तसेच तितकीच शेतमजूर कुटुंबे मिळून जवळपास २५ कोटी कुटुंबाचे उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेती व्यवसायावर ७२ कोटी जनतेचे अवलंबित्व आहे. यावरुन शेती व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते.

इतकी प्रचंडा रोजगाराची क्षमता आसणा-या व्यवसायाची उपेक्षा करणे देशाला परवडणारे नाही. दुर्दैवाने देशाच्या राज्यकर्त्यांना आणि धोरणे ठारविणा-या निती आयोगाला, हे ज्ञात नाही. अथवा राज्यकर्ते व निती आयोग झोपेचे सोंग घेत आहे, आशा सशयाला पुरेसा वाव आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीने जगातील राज्यकर्त्यांना शेतीचे महत्व पटवून दिले आहे.कोरोनाने माणूस भौतिक सुखसाधनांशिवाय जगू शकतो, पणा अन्नपाण्याशिवाय नाही, हे अधोरेखित केले आहे. कोरोनाचे संकट पथ्यावर पडतील अशी स्थिती जगभर निर्माण झाली. तथापि, कृषिप्रधान देशाच्या राजव्यवस्थेला संकटाचे रुपांतर संधीत करण्याची किमया साधता आली नाही. इथे एक ध्यानात घेतलेच पाहिजे की, शेतक-यांनी देश आन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ, दूध, मांस याबाबातीत स्वयंपूर्ण केला. यामुळेच देशाला करोनाच्या भयावह संकटात कोणापुढे पदर पसरण्याची वेळ आली नाही. शेतक-यांच्या घामाची ही कढी, राज्यकर्ते धावू धावू मोफत वाटित आहे. त्यावर राजकारणाची पोळी भाजून घेत आहे.
असे वास्तव आसताना शेतक-यांना मात्र रास्त भावासाठी शासनाकडे पदर पसरावा लागत आहे. ही शेतीप्रधान देशाची शोकांतिकाच नव्हे काय? मेहनत करुन पिकवायचं आणि मातीमोल विकायचं हे देशातील शेतीचं ब्रिद बनलं आहे. सन १९८० पासून शेतकरी “घामाचे दाम”मागतोय. मात्र स्वातंञ्यापासून आजतागायत शेतक-यांनाची ही मागणी मान्य होत नाही, याला काय म्हणावे? राबराब राबायचे आणि पदरी काय, तर कंगालपण आणि त्याआडून कर्जबाजारीपणा.याचा शेवट कशात तर आत्महत्या करुन जगणं संपविण्यात.

देशाने कोडकौतुक करुन तीस वर्षांपूर्वी जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था स्विकारली.यात ठराविक उद्योगपतींचे चांगभले झाले. शेतक-यांच्या वाटेला मात्र गुलामगिरीच आली. स्वातंञ्याचा जमाखर्च मांडताना अर्थतज्ञ व राज्यकर्त्यांना शेती व्यवसायाचा हिशोब मांडावासा वाटत नाही, यापरता करंटेपणा नाही.

आज एकरी उत्पादन वाढवून, देशाला शेतमालाबाबत स्वालंबी करणारा शेतकरी माञ परावलंबी आहे. स्वातंञ्य सत्तरीनंतरही तो पराधीन आहे. दोनच महिन्यापूर्वी सरकारने उद्योगपतींचे सुमारे पाच लाख कोटींची कर्जे निर्लेखित (माफ नव्हे तर राईट आॕफ केली हा सरकारचा युक्तीवाद) केली. त्याचवेळी शेतक-यांची कर्जे माफ करण्याची दानत मात्र राज्यकर्त्यांना दाखविता आली नाही. याचाच आर्थ हा देश शेतीप्रधान नसून भांडवलदार धार्जिणा असल्याचेच, राज्यकर्यांच्या कृतीतून दिसते.

याचा अर्थ एकच की खुल्या अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतकरी, कष्टक-यांसाठी जागा नाही. ही जागा मूठभार भांडवलदार, उद्योगपती, धनदांडगे, सनदी व शासकीय नोकरशाहिने व्यापली आहे. थोडक्यात देशाचे”चोराला मलिदा,धन्याला धत्तुरा”असे वास्तव आहे.


भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

2 COMMENTS

  1. I do agree with all the ideas you have presented in your post. They’re very convincing and will certainly work. Still, the posts are very short for newbies. Could you please extend them a bit from next time? Thanks for the post.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here