पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या!

3

कोरोनामुळे ओढावलेल्या बेकरीतुन उद्भवला कौटुंबिक वाद

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील घटना

टिळकनगर : वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची हत्या केली तर स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे ही घटना घडली.
शिल्पा आणि राजन अरुण गायकवाड असे मयत पती पत्नीचे नाव आहे.
शिल्पा आणि राजन यांना दोन मुली आहेत. दुपारी आई वडिलांचे वाद होताना लहान मुलीने पाहिले. राजन याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घातला. मुलीने हा प्रकार जवळच राहत असलेल्या आईच्या माहेरी सांगितला. त्यानंतर शिल्पाला दवाखान्यात नेण्यात आले.


दरम्यान शिल्पाची प्रकृती खालावल्याने श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे शिल्पाचा पती राजन यानेही रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. कोरोनामुळे उद्भवलेली बेरोजगारी, व्यसनाधीनतेने दोन मुलींच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here