आषाढी वारी : एकनाथ महाराज, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, व सोपानकाका पालखी सोहळा कोरोना संकटामुळे रद्द

प्रातिनिधीक छायाचित्र

…तर परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही सरकार समोर मांडले

आळंदी व देहू संस्थानच्या पालखी सोहळ्याचा निर्णय 29 मे रोजी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाच्या सावटामुळे गेल्या अनेक वर्षांच्या आषाढी वारीमध्ये पालखी सोहळ्याची परंपरा असलेल्या सात मानाच्या पालख्यांपैकी चार ठिकाणच्या पालख्यांनी यंदाचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पैठणची एकनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज पालखी, जळगावच्या मुक्ताईनगरची मुक्ताईनगर पालखी आणि सासवडची सोपानकाका पालखी यांनी हा निर्णय घेतला आहे. तर आळंदीहून निघणारी माऊलींची पालखी आणि देहूहून निघणा-या संत तुकाराम पालखी सोहळ्याबाबत 29 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे.

…तर परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही सरकार समोर मांडले

एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी म्हणाले, प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. म्हणजे पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल आणि दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. दशमीला तीस मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. कमीत कमी पाच लोकांना सरकारने परवानगी दिली तर पायी सोहळा पूर्ण करू अन्यथा दशमीला पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. परवानगी मिळाली तर पैठण ते पंढरपूर हा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here