Shrigonda : शहरातील वेश्या व्यवसायावर छापा; तीन गुलछबू एक दलाल पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – शहरात भाजी मंडई परिसरात सूरु असणाऱ्या वेश्या व्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकत तीन गुलछबू सह हा व्यवसाय चालविणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.

पोलीस उपाधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना श्रीगोंदा शहरातील भाजी मंडई परिसरात “त्या ठिकाणावर” पुन्हा वेश्या व्यवसाय सूरु झाल्याची माहिती मिळाली. या माहिती बाबत पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. आज (२७) दुपारी एकच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हवालदार रोहिदास झुंजार, अमोल आजबे, खारतोड़े, महिला पोलिस कर्मचारी लता पुराणे, छाया माने यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तीन गुलछबू त्या ठिकाणी आढळून आले. त्याचबरोबर तीन महिला आढळून आल्या.

पोलिस पथकाने त्या तिघांसह मालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे. यातील दोन आबंटशौकीन श्रीगोंदा शहरातील तर एक आढळगाव येथील असल्याचे समजते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here