Shrigonda : खासदार सुजय विखे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत गोरगरिब गरजवंतांना सुरु केलेल्या धान्य वाटप कार्यक्रमाला  तालुक्यातील आढळगावात गालबोट लागले. खासदार विखे पाटील वाटपाचा कार्यक्रम सुरु करुन निघून गेले आणि एकच गोंधळ उडाला.

नियोजनापेक्षा जास्त संख्या जमल्यामुळे राजकीय मंडळींनी पाठ फिरवली की नियोजन कोलमडले फिजिकल डिस्टन्सिंगचा गर्दीला विसर पडला. धान्य घेण्यासाठी आलेला एक तळीराम माजी पदाधिका-याच्या अंगावर धावला. गोंधळामुळे गरजवंत धान्यापासून वंचित राहिले. तालुक्यातील हंगेवाडी, मढेवडगाव, वांगदरीसह आढळगावात खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्यांना धान्य वाटपाचे नियोजन केले. गरजूंची यादी तयार करण्यात आली. आढळगावात १७५ लोकांना बोलविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात २५० लोक गोळा झाले.

खासदार डाॅ. सुजय विखे पाटील आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह कार्यकर्ते तालुक्यातील आढळगावात पोहोचले. सोशल डिस्टन्सिंग राखून खासदार विखे पाटील यांनी धान्य वाटप सुरु करुन पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. खासदारांची पाठ फिरताच जमलेल्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली देऊन धान्य मिळविण्यासाठी एकच गर्दी केली. धान्य पळवा पळवी सुरु झाली. सर्व गोंधळाला आवरण्याचा प्रयत्न करणा-या एका माजी पदाधिका-याच्या अंगावर एक तळीराम धावून गेला. त्यांच्यात बाचाबाची झाली. गोंधळामुळे कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here