National : लॉकडाऊनच्या काळातील सर्वात हृदयद्रावक घटना; भूक व तहानेने व्याकुळलेल्या मातेचा स्टेशनवर मृत्यू; तर मृत आईला वारंवार जागवणारा अबोध बालक

मजूरांसाठी सोडलेल्या श्रमिक ट्रेनमध्ये ना जेवणाची व्यवस्था ना पाण्याची त्यात उन्हाचा कहर
एकीकडे मातेने सोडले प्राण; तर दुसरीकडे तान्ह्या लेकराचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळातील सर्वात जास्त हृदयद्रावक घटना आज बिहार येथील मुझफ्परपूर स्टेशनवर पाहायला मिळाली. गुजरात येथून श्रमिक स्पेशल ट्रेन ने एक महिला आपल्या मुलांना घेऊन निघाली होती. ही ट्रेन शनिवारी गुजरात येथून निघाल्यानंतर सोमवारी मुझ्झफरपूर बिहार येथे पोहोचली. मात्र, प्रचंड उष्णता आणि ट्रेनमध्ये जेवण व पाणी न मिळाल्याने झालेले हाल, यामुळे तिने स्टेशनवर पोहोचताच दम तोडला.

तिच्या सोबत असलेल्या अबोध बालकाला आपली आई आता या जगात नाहीए हे कोण समजून सांगणार? तो मात्र, मायेपोटी सतत तिच्यावर टाकण्यात आलेल्या चादरीच्या आत -बाहेर करीत तिला जागवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी दुस-या एका मुलाने त्याला तेथून उचलून नेले.

तर याच स्टेशनवर दिल्ली येथून निघालेल्या एका परिवारातील तान्हुल्याचा भूखेमुळे मृत्यू झाला. ट्रेनमध्ये जेवायला काहीही न मिळाल्याने आईला दूध उतरले नाही. परिणामी प्रचंड उष्णता आणि भूख यामुळे या मुलाचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here