Shevgaon : रोटेशनमधून मागणी केलेल्या पिकांना पाणी न देताच पाणी बंद करण्यात आल्याची शेतक-यांची तक्रार

0
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या रोटेशनमधून मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या  पिकांना पाणी न देताच पाणी बंद करण्यात आल्याची तक्रार मळेगाव व सामनगाव ता.शेवगाव येथील शेतकऱ्यांनी मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. 

याबाबत येथील शेतकऱ्यांनी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मुळा धरणाच्या उन्हाळी रोटेशनमधून टेल टू हेड पध्दतीने भरणे सुरू आहे. मात्र पाटबंधारे विभागाने सामनगाव, लोळेगाव आणि मळेगाव कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेखालील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे भरणे झालेले नसताना अचानक दि.२५मे पासून पाणी बंद केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी भातकुडगावच्या शाखा अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. अचानक पाणी बंद केल्याने या भागातील अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी देण्याची मागणी मुळा पाटबंधारे विभागाचे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.

निवेदनावर विजय कापरे,नामदेव तागड,अदिनाथ झाडे,सोन्याबापू राशिनकर, अनिल निकम,अशोक राशिनकर, क्रुष्णा राशिनकर, संजय निकम,बाबासाहेब निकम,रोहीदास निकम,संदिप राशिनकर, कैलास निकम ,अशोक निकम आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here